जामखेड न्युज——-
शिक्षक व शिक्षकेतरांना जुनी पेन्शन योजना लागू करावी
जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघर्ष संघटना व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोअर कमिटीने तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.
नवीन पेन्शन योजना लागू केल्यास कर्मचाऱ्यांचे खाते व त्यांच्या वेतनाच्या १४ टक्के शासन हिस्सा जमा करावा लागणार असून शासनावर मोठा वित्तीय भार पडणार आहे. याचबरोबर शासनाकडे मोठ्या प्रमाणात जमा होणारा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीही जमा होणे बंद होणार आहे. जुन्या पेन्शन योजनेमुळे फक्त सेवानिवृत्त व मयत कर्मचाऱ्यांना शासनाला पेन्शन द्यावी लागणार असून त्यांची संख्याही नगण्य असल्याने शासनावर अर्थिक बोजा पडणार नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. नवीन पेन्शन योजना लागू केल्यास कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार आहे. अनेक कर्मचारी सेवानिवृत्त व मयत झालेले असून त्यांची कोणतीही रक्कम कपात झालेली नाही. शिवाय या कर्मचाऱ्यांच्या नावावर शासन हिस्साही जमा झालेला नसल्याने या कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संरक्षण मिळणार नाही. सध्या कार्यरत अनेक कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्ष सेवा झाल्या असून सेवा काळही संपत आला आहे. त्यांना आकस्मिक सेवानिवृत्ती घ्यावी लागल्यास सेवानिवृत्तीचा लाभ मिळणार नाही.

अनेक कर्मचाऱ्यांची नियुक्ती २००५ च्या आगोदर नियुक्ती झालेली आहे. शंभर टक्के अनुदान मात्र २००५ नंतर आले आहे अशा कर्मचाऱ्यांचे आगोदर भविष्य निर्वाह निधी खाते उघडले होते काही रक्कमही जमा झालेली आहे. नंतर भविष्य निर्वाह निधी खाते बंद करून डीसीपीएस खाते उघडले यातही काही हप्ते जमा झाले नंतर एनपीएस खाते उघडले यातही काही रक्कम जमा झाली आहे. यामुळे शासनाने डीसीपीएस व एनपीएस खात्यातील रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करावी व जुनी पेशन्स योजना लागू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करावी, असे निवेदन संघटनेतर्फे तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले यावेळी तहसीलदार यांनी सांगितले की, आपले निवेदन शासनापर्यत ताबडतोब पाठवले जाईल.
यावेळी तालुकाध्यक्ष पी. टी. गायकवाड, सचिव रमेश बोलभट, भरत लहाने, बी. आर. इथापे, गाडेकर सी. जे, स्वामी एस. एस, बाजीराव गर्जे, सुर्यकांत कदम, रासकर बी. के, कावळे बी. बी, फाटके बी. एम, सुतार आर. बी, गागर्डे बी. के, बबन राठोड, कैलास वराट, रोहित घोडेस्वार, हनुमंत वराट, मुकुंद राऊत, नरेंद्र डहाळे, पोपट जगदाळे, विजय क्षीरसागर, विशाल पोले, नागरगोजे वाय. के, देशमुख ए. एस, सांगळे ए. डी,
पाचारण व्ही. वाय, जाधव एस. एस, लटपटे डी. व्ही, सय्यद जे. एस, आनारसे ए. एन, संतोष देशमुख, देशमुख एस. एस, कुलकर्णी के. पी, पवार एस. एस यांच्या सह अनेक शिक्षक हजर होते.






