Wednesday, August 5, 2026
Home शैक्षणिक बातम्या आर्यभट्ट अबॅकस अकॅडमीत राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याची जय्यत तयारी

आर्यभट्ट अबॅकस अकॅडमीत राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याची जय्यत तयारी

0
3

जामखेड न्युज – – – – – – 

आर्यभट्ट अबॅकस अकॅडमीत राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याची जय्यत तयारी

आर्यभट्ट अबॅकस अँड वैदिक मंथ अकॅडमीच्या वतीने आयोजित नॅशनल लेव्हल अबॅकस कॉम्पिटिशनच्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत करण्यात आले आहे.

हा भव्य सोहळा युग लॉन्स, हॉटेल आष्ठा फाटा, चिंचपूर (ता. आष्टी, जि. बीड) येथे संपन्न होणार असून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. दादासाहेब गिते (निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर) हे उपस्थित राहणार आहेत.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संजय कोठारी (राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, जैन कॉन्फरन्स, दिल्ली) आणि प्रांजलताई चिंतामणी (नगराध्यक्षा, नगरपरिषद जामखेड) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच बाबासाहेब शेकडे, सभापती पै. शरद कार्ले , अमितभाऊ चिंतामणी, सुदाम वराट, नंदकुमार ठोंबरे, रविंद्र घुले, सभापती प्रविण सानप, हिना ईस्माईल सय्यद, लक्ष्मण गर्जे, अशोक वामन, मनोज दळवी, राजेंद्र देशपांडे, डॉ. युवराज खराडे, अप्पा शिरसाठ, डॉ. पल्लवी सूर्यवंशी, साक्षी काळदाते, दीपाली तवटे, धनश्री उगले, स्वाती कुरमुडे, अमृता रसाळ, युवराज रोकडे, सोपान उत्तम बडे, थोरवे साहेब, वृषाली बोराटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्रे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना देण्यासाठी आर्यभट्ट अबॅकस अकॅडमी सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, या सोहळ्यास विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाचे निमंत्रक आर्यभट्ट अबॅकस अँड वैदिक मंथ अकॅडमी सर्व टीम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!