श्री साकेश्वर विद्यालयास लेखा अधिकारी सतीश लहाने यांची सदिच्छा भेट
अहिल्यानगर जिल्हा शिक्षण विभागाचे लेखा अधिकारी तथा वरिष्ठ लेखापरीक्षक (Senior Auditor) माननीय श्री. सतीश लहाने साहेब यांनी आज श्री साकेश्वर विद्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी विद्यालयाच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करून सन्मान करण्यात आला.
श्री. लहाने साहेब यांनी विद्यालयातील शैक्षणिक उपक्रम, प्रशासकीय कामकाज तसेच विविध शैक्षणिक सुविधांची माहिती जाणून घेतली. विद्यालयातील शैक्षणिक वातावरण, शिक्षकांचे कार्य आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी विद्यालयाच्या वतीने श्री. सतीश लहाने साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळाली.
लेखा अधिकारी सतीश लहाने यांचा सत्कार करताना त्यांचे वडील मारूती लहाने, विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत लहाने, अर्जुन रासकर, त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, मुकुंद वराट, सचिन वराट, प्रसाद होशिंग, ज्योती लहाने, सागर पवार, अतुल दळवी, आण्णा विटकर यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदिच्छा भेटीबद्दल विद्यालयाच्या वतीने श्री. लहाने साहेबांचे आभार मानण्यात आले.