कालिका पोद्दार लर्न स्कुल जामखेड येथे वार्षिक दोन दिवसीय क्रीडा दिन उत्साहात साजरा जामखेडमध्ये महिलांसाठी स्व संरक्षण शिबीर घेणार – लक्ष्मीकांत खिची

0
226

जामखेड न्युज——

कालिका पोद्दार लर्न स्कुल जामखेड येथे वार्षिक दोन दिवसीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

जामखेडमध्ये महिलांसाठी स्व संरक्षण शिबीर घेणार – लक्ष्मीकांत खिची

कालिका पोदार लर्न स्कूल व पोदार जंबो किड्स जामखेड येथे वार्षिक दोन दिवसीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पहिल्या दिवशी कार्यक्रमाच्या अध्यक्षा लीना विश्वकर्मा मॅडम (प्रिन्सिपल पोदार जंबो किड्स ) प्रमुख पाहुणे म्हणून मा श्री प्रशांत जोशी ( प्रिंसिपल कालिका पोदार लर्न स्कुल ) पोदार जंबो किड्स च्या विध्यार्थ्यांचे खेळ घेण्यात आले यामध्ये सिंगल रेस,झेब्रा क्रोशिंग,airoplane puzzle, सेल प्लेन रेस रन to हेल्प हॉर्स इंजिन तसेच यामध्येही पालकांची देखील रेस व इतर खेळ घेण्यात आले. जामखेडमध्ये महिलांसाठी स्व संरक्षण शिबीर घेणार असल्याचे लक्ष्मीकांत खिची यांनी सांगितले.

स्पोर्ट्स डे मुलांचा विकास होण्यास आणि विविध खेळांमध्ये रस घेण्यास मदत करतो त्यामुळे या वर्षी स्पोर्ट डेची थीम, जंबो ऑन व्हील होती. ही थीम आमच्या मुलांना विविध प्रॉप्स आणि पोशाख वापरून वाहतुकीच्या विविध पद्धतींबद्दल चांगल्या प्रकारे समजून देण्यासाठी निवडली गेली होती. विविध क्रियाकलापांद्वारे वाहतुकीच्या पद्धतींबद्दल सर्व जाणून घेण्यासाठी हे विविध कौशल्यांमध्ये स्वारस्य विकसित करण्यासाठी केले जाईल जसे की चिकाटीची सांघिक भावना निर्माण होईल


या स्पोर्ट्स डे या उपक्रमांमध्ये खेळांचा उपयोग केवळ शारीरिकच नव्हे तर मुलांच्या संज्ञानात्मक आणि सामाजिक विकासासाठी देखील केला जातो ज्यामुळे मुले विविध शर्यतींमध्ये सहभागी होतील ज्यामुळे त्यांची सर्वांगीण वाढ आणि त्यांना खेळताना शिकण्याची संधी मिळण्यास मदत होईल.

यावेळी पोदार जंबो किड्स चे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विध्यार्थी वृषाली जाधवर हिने केले

दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमासाठी कर्यक्रमाचे अध्यक्ष मा् श्री प्रशांत जोशी (प्रिन्सिपल कालिका पोदार लर्न स्कूल) प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद येथिल श्री लक्ष्मीकांत खिची हे उपस्थित होते.ते अर्चरी (धनुर्विद्या) या खेळाचे राज्य संघटनेचे अध्यक्ष आहेत.व त्यांना झी अनन्या पूरस्कार प्राप्त, त्याचप्रमाणे ते ज्यूडो, कराटे, कुग्फू, अर्चरी, अकेरी, स्वयंसिद्धा,या सहा खेळामधील प्रशिक्षण पुर्ण केले आहे. त्याचप्रमाणे ते विविध खेळांचे राष्ट्रीय पंच आहेत.शिवाय त्यांनी योगशास्रातील हटयोग आचार्य हि पदवी संपादन केली आहे.व त्यांच्या भाषणातून असे सांगतले कि जामखेड च्या महिला साठी सेल्फ डिफेन्सचा कॅम्प घेण्याचे जाहीर केले आहे. तसेच अंतराष्ट्रीय दर्जाचे कोच श्री योगेश कुलकर्णी हे उपस्थित होते.तसेच पोदार लर्न स्कूल केज चे प्रिन्सिपल श्री योगेश ईरतकर हे उपस्थित होते. स्थापत्यकलाशास्र प्रविण श्री मनोराज मडिलगेकर हे ही उपस्थित होते .

या कार्यक्रमाची सुरवात स्कूल ध्वजारोहनाने झाली.झेंड्याला मानवंदना देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांचा शपथविधी घेण्यात आला.त्यानंतर बालगोपालांचा विविधरंगी कार्यक्रम रंगला .त्यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी विविध माध्यमातून उद्घाटन समारंभ सोहळा साजरा केला . प्रमुख पाहुण्यानी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला.त्यानंतर मुख्य कार्यक्रमाची सुरवात झाली.यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी मैदानी खेळात हिरिरीने सहभाग घेतला. विविध खेळात नैपुन्य दाखऊन चारही हाउसने चुरसीची लढाई दिली.यामध्ये तिसरा क्रमांक मिळवला तो वेंटस हाऊसने ,दुसरा क्रमांक इगनीस हाऊस आणि टेरा हाऊस यामध्ये विभागून मिळाला आणि पहिला क्रमांकाचा व मानाच्या ट्रॉफीचा सन्मान मिळाला तो एक्वा हाऊसला.

या कार्यक्रमात पाल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या पालकांनीही सहभाग नोंदवला.विद्यार्थ्याना लाजवेल अशी चुरशीची लढाई देऊन यश संपादन केले. विजेत्या पालकांना सुवर्ण, रौप्य व कांश्य पदके देऊन संमानीत केले.

तसेच या कार्यक्रमांचा बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्रिन्सिपल श्री प्रशांत जोशी, सागर अंदुरे (कालिका पोदार लर्न स्कूल चे पदाधिकारी) श्री निलेश तवटे (कालिका पोदार लर्न स्कूल चे पदाधिकारी) नितीन तवटे (कालिका पोदार लर्न स्कूल चे पदाधिकारी) प्रमुख पाहूणे लक्ष्मीकांत खिची, योगेश कुलकर्णी, योगेश ईरतकर, मनोराज मडीलगेकर, पालक शिक्षक संगाचे पदाधिकारी व पालकवर्ग यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमात शिक्षकवृंदानीही महत्वाची भुमिका बजावली. सुत्रसंचालन निवृत्ती लोहार व ज्योती कनका यांनी केले. सर्व कार्यक्रमाचे व्यवस्थापने साठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विषेश सहकार्य केले.

अतिशय उत्साहामध्ये हा क्रीडादिनाचा कार्यक्रम राष्ट्रगान(वंदेमातरम) या गीताने संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here