नगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी आप्पासाहेब शिंदे, सचिवपदी राजेंद्र खेडकर तर हिशोब तपासणीसपदी भरत लहाने

0
188

जामखेड न्युज——

नगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी आप्पासाहेब शिंदे, सचिवपदी राजेंद्र खेडकर तर
हिशोब तपासणीसपदी भरत लहाने

जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. संघाच्या अध्यक्षपदी शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे (नगर) तर सचिवपदी राजेंद्र खेडकर (श्रीगोंदा) तर हिशोब तपासणीसपदी भरत लहाने यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या आहेत.

नगरममध्ये संघाची हरिश्चंद्र नलगे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी चांगदेव कडू, मच्छिंद्र लगड, शिवाजी हरिश्चंद्रे, रामनाथ सुरुसे, बाजीराव कोरडे, राजेंद्र कोतकर, महेंद्र हिंगे, नंदकुमार शितोळे, उध्दव गायकवाड,विठ्ठल पानसरे, बबनराव लांडगे, बाळासाहेब भोर, अर्जुन भुजबळ, मंगेश काळे, छबुराव फुंदे, रमेश अडसूळ, पी. टी. गायकवाड, बी.ए.पारखे, शहाजी वायकर, बबन राठोड, बी. आर. इथापे, रमेश बोलभट, सूर्यकांत कदम, भरत लहाने, दत्तात्रय राजमाने आदीसह जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संघाच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

उपाध्यक्षपदी प्रशांत होन (श्रीरामपूर), राजेंद्र कोहकडे (राहाता), संजय देशमाने (कर्जत), बाळकृष्ण चोपडे (संगमनेर), संभाजी गाडे (राहुरी), सहसचिवपदी रावसाहेब शेळके (अकोला), भाऊसाहेब जिवडे (नगर), दादासाहेब देशमुख (शेवगाव) आत्माराम दहिफळे, वाल्मिक रौंदाळे (पाथडी), (कोपरगाव), खजिनदारपदी बाळासाहेब निवडुंगे (पारनेर), हिशोब तपासणीसपदी भरत लहाने (जामखेड), रावसाहेब चौधरी (नेवासा), आश्रमशाळा प्रतिनिधोपदी दत्ता जाधव (अकोले) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नवीन कार्यकारिणी पुढील दोन वर्षांसाठी राहणार आहे. या नवनिर्वाचित पदाधिकान्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here