Friday, September 25, 2026
Home क्राईम न्यूज गणपती वर्गणीवरून वाद पेटला, तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण “वर्गणी देणार नाही”...

गणपती वर्गणीवरून वाद पेटला, तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण “वर्गणी देणार नाही” म्हणताच संताप, मिरजगाव पोलिसांत दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

0
2
गणपती वर्गणीवरून वाद पेटला, तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण   “वर्गणी देणार नाही” म्हणताच संताप, मिरजगाव पोलिसांत दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

जामखेड न्युज – – – – – 

गणपती वर्गणीवरून वाद पेटला, तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण

“वर्गणी देणार नाही” म्हणताच संताप, मिरजगाव पोलिसांत दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

 

गणपती उत्सवासाठी १ हजार रुपये वर्गणी देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना कर्जत तालुक्यातील नागलवाडी येथे घडली. याप्रकरणी मिरजगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

मिरजगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश संजय गिरे (वय २४, व्यवसाय खासगी नोकरी, हेल्पर, सौर ऊर्जा प्रकल्प, नागलवाडी) हे सौर ऊर्जा प्रकल्प नागलवाडी येथे कामावर असताना काही इसम त्यांच्याकडे गणपती उत्सवासाठी वर्गणी मागण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी, “वर्गणी गावातील दुसऱ्या मंडळास दिलेली असून तुम्हांस वर्गणी देणार नाही,” असे सांगितले.

याचा राग मनात धरून दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक, नागलवाडी येथे बाळू ऊर्फ वृषभ धनंजय शेळके व तुषार धनंजय शेळके (दोघे रा. नागलवाडी, ता. कर्जत) यांनी फिर्यादी महेश गिरे यांना “वर्गणी दिली नाही” असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच शिवीगाळ करून दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या घटनेनंतर महेश गिरे यांनी मिरजगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार बाळू ऊर्फ वृषभ धनंजय शेळके आणि तुषार धनंजय शेळके या दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड व मिरजगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस अंमलदारांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!