Friday, October 23, 2026
Home क्राईम न्यूज तरुणाचा हात तोडणाऱ्या हल्ल्यात जामखेड पोलिसांचा दणका, आणखी दोन आरोपी जेरबंद, एकूण...

तरुणाचा हात तोडणाऱ्या हल्ल्यात जामखेड पोलिसांचा दणका, आणखी दोन आरोपी जेरबंद, एकूण संख्या चारवर! आणखी आरोपी पोलिसांच्या रडारवर, हल्ल्यामागील कटाचा उलगडा होणार?

0
2
तरुणाचा हात तोडणाऱ्या हल्ल्यात जामखेड पोलिसांचा दणका, आणखी दोन आरोपी जेरबंद, एकूण संख्या चारवर!  आणखी आरोपी पोलिसांच्या रडारवर, हल्ल्यामागील कटाचा उलगडा होणार?

जामखेड न्युज – – – – – 

तरुणाचा हात तोडणाऱ्या हल्ल्यात जामखेड पोलिसांचा दणका, आणखी दोन आरोपी जेरबंद, एकूण संख्या चारवर!

आणखी आरोपी पोलिसांच्या रडारवर, हल्ल्यामागील कटाचा उलगडा होणार?


जामखेड शहरातील कान्होपात्रानगर परिसरात राहुल हिरामण अंधारे (वय ३४) या तरुणावर जीवघेणा हल्ला करून त्याचा हात तोडल्याच्या गंभीर प्रकरणात जामखेड पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. गणेश प्रभाकर चव्हाण (वय ३०, रा. सावरगाव, ता. जामखेड) आणि वसीम मस्तफा शेख (वय ३३, रा. ढोरगल्ली, ता. आष्टी, जि. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आष्टी तालुक्यातील चिंचपूर गावच्या शिवारातून या दोघांना ताब्यात घेण्यात आले. जुन्या भांडणाचा राग मनात धरून साथीदारांच्या मदतीने हल्ल्याचा कट रचल्याची माहिती तपासादरम्यान समोर आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

१४ ऑक्टोबर रोजी तरुणावर जीवघेणा हल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.३५ वाजण्याच्या सुमारास राहुल हिरामण अंधारे याच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्याचा हात गंभीररीत्या जखमी होऊन तो तोडण्यात आला होता. या घटनेमुळे जामखेड शहरात खळबळ उडाली होती.


घटनेनंतर जखमी राहुल अंधारे याचा रुग्णालयात जबाब नोंदविण्यात आला. त्यानुसार जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७०२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०९(१), ३५२ आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

जुन्या भांडणातून कट रचल्याचा पोलिसांचा दावा
या गुन्ह्यात यापूर्वी अटक केलेल्या आरोपींची पोलीस कोठडीत चौकशी सुरू असताना २२ ऑक्टोबर रोजी हल्ल्यामागील कारण आणि अन्य साथीदारांविषयी माहिती घेण्यात आली. यावेळी मागील भांडणाच्या रागातून साथीदारांच्या मदतीने कट रचून हा गुन्हा केल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या तपासादरम्यान गणेश प्रभाकर चव्हाण आणि वसीम मस्तफा शेख यांची नावे समोर आली. त्यानंतर पोलिसांनी या दोघांचा शोध सुरू केला. या माहितीच्या आधारे तपासाला नवी दिशा मिळाली.

चिंचपूर शिवारात शोधमोहीम; दोघांना अटक जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना संबंधित संशयित आरोपी आष्टी तालुक्यातील चिंचपूर गावात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे आणि त्यांच्या पथकाने चिंचपूर येथे जाऊन शोधमोहीम राबवली.
या मोहिमेदरम्यान दोन्ही संशयित चिंचपूर गावच्या शिवारात आढळून आले.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली. त्यानंतर दोघांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली. या कारवाईमुळे हल्ला प्रकरणाच्या तपासाला आणखी गती मिळाली आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची कारवाई
ही कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मक्का, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर आणि जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर बेल्हेकर, गणेश साने, दत्तू बेलेकर आणि प्रकाश जाधव यांनी सहभाग घेतला. या गंभीर हल्ला प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे करीत आहेत. हल्ल्यामागील नेमके कारण, गुन्ह्यातील इतर संबंधित व्यक्तींची भूमिका आणि घटनेशी संबंधित अन्य बाबी तपासातून स्पष्ट होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!