Tuesday, November 10, 2026
Home क्राईम न्यूज कर्नाटकचा २८ लाखांचा गुटखा जामखेडच्या वेशीवरच पकडला! जातेगाव फाट्यावर स्थानिक...

कर्नाटकचा २८ लाखांचा गुटखा जामखेडच्या वेशीवरच पकडला! जातेगाव फाट्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, आयशर टेम्पोसह २८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक तर दोघे फरार!

0
2
कर्नाटकचा २८ लाखांचा गुटखा जामखेडच्या वेशीवरच पकडला!   जातेगाव फाट्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, आयशर टेम्पोसह २८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक तर दोघे फरार!

जामखेड न्युज – – – – – 

कर्नाटकचा २८ लाखांचा गुटखा जामखेडच्या वेशीवरच पकडला!

जातेगाव फाट्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, आयशर टेम्पोसह २८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक तर दोघे फरार!

कर्नाटकातून जामखेडकडे विक्रीसाठी आणला जाणारा तब्बल २८ लाख ४ हजार १६० रुपयांचा प्रतिबंधित सम्राट पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. खर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जातेगाव फाटा येथे सापळा रचून पोलिसांनी आयशर टेम्पोसह मोठा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून, कर्नाटकातील दोन संशयित आरोपी फरार आहेत.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक जिल्ह्यात गस्त घालत असताना, खर्डा येथून जामखेडकडे आयशर टेम्पोमधून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी खर्डा-जामखेड मार्गावरील जातेगाव फाटा येथे सापळा रचला. संशयित आयशर टेम्पो (क्र. MH-10-DT-0267) तेथे येताच पोलिसांनी तो थांबवून तपासणी केली. यावेळी वाहनात मोठ्या प्रमाणात सम्राट पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.

२८ लाखांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी १९ लाख ८८ हजार रुपयांचा सम्राट पानमसाला, १ लाख १६ हजार १६० रुपयांची सुगंधित तंबाखू आणि १५ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण २८ लाख ४ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

एकाला अटक, दोघे फरार
या प्रकरणी साबीर कौसर शेख (वय २४, रा. शेकापूर, ता. भूम, जि. धाराशिव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने हा गुटखा कर्नाटकातील संतोष चंद्रप्पा पुर्णा (रा. बिदर) आणि रविंद्र शरणप्पा (रा. बापूर, जि. बिदर) यांनी विक्रीसाठी पाठविल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघे सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
ताब्यातील आरोपी व जप्त मुद्देमाल खर्डा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. याप्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार रोहित मिसाळ, निळकंठ कारखेले, अरुण गांगुर्डे, बिरप्पा करमल आणि दीपक जाधव यांनी ही कारवाई केली.

कर्नाटकातून जामखेडपर्यंत पोहोचणाऱ्या प्रतिबंधित गुटख्याच्या वाहतुकीवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रीच्या साखळीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. फरार संशयितांचा शोध लागल्यानंतर या प्रकरणातील आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!