Saturday, November 14, 2026
Home शैक्षणिक बातम्या जामखेडच्या शैक्षणिक क्षेत्राचा राज्यस्तरावर गौरव! प्राचार्या अस्मिता जोगदंड (भोरे) यांना गुणवंत...

जामखेडच्या शैक्षणिक क्षेत्राचा राज्यस्तरावर गौरव! प्राचार्या अस्मिता जोगदंड (भोरे) यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान

0
2
जामखेडच्या शैक्षणिक क्षेत्राचा राज्यस्तरावर गौरव!  प्राचार्या अस्मिता जोगदंड (भोरे) यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान

जामखेड न्युज – – – – – – 

जामखेडच्या शैक्षणिक क्षेत्राचा राज्यस्तरावर गौरव!

प्राचार्या अस्मिता जोगदंड (भोरे) यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्राचार्या अस्मिता जोगदंड (भोरे) यांना प्रदान करण्यात आला. पालघर जिल्ह्यातील बोर्डी, ता. डहाणू येथे आयोजित सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

यावेळी महामंडळाचे कार्याध्यक्ष तथा कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुनील पंडित, शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे, डॉ. संजय भोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, शाळेच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य आणि मुख्याध्यापक म्हणून पार पाडलेली जबाबदारी या कार्याची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आला.

या पुरस्कारामुळे जामखेडच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, परिसरातील शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या या यशामुळे शिक्षक, शिक्षणप्रेमी आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्या अस्मिता जोगदंड (भोरे) यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!