शिक्षकाला स्वतः च्या जमिनीत येण्यास मज्जाव करत जीवे मारण्याची धमकी, चार जणांविरोधात गुन्हा दाखल पोलीस स्टेशनला तक्रार का केली म्हणून दमबाजी व शिविगाळ, तीघांविरोधात गुन्हा दाखल, राजेवाडी येथील घटना
शिक्षकाला स्वतः च्या जमिनीत येण्यास मज्जाव करत जीवे मारण्याची धमकी, चार जणांविरोधात गुन्हा दाखल
पोलीस स्टेशनला तक्रार का केली म्हणून दमबाजी व शिविगाळ, तीघांविरोधात गुन्हा दाखल, राजेवाडी ची घटना
जामखेड तालुक्यातील राजेवाडी शिवारात प्राथमिक शिक्षक बाबासाहेब बळीराम कुमटकर वय 55 वर्षे यांनी गट नं 55 मध्ये जमीन विकत घेतलेली आहे. सदर जमिनीची मशागत करण्यासाठी जावे लागते दि. 10/04/2026 रोजी दुपारी 03/30वा.चे सुमारास बाबासाहेब बळीराम कुमटकर हे शेत गट नं 55 येथील राजेवाडी शिवार येथे गेले असता तेथे दारू पिऊन फिर्यादीचा भाऊ नामे ) बिभिषण बळीराम कुमटकर रा.राजेवाडी ता जामखेड जि अहिल्यानगर हा मला म्हणाला की तु इकडे यायचे जायचे नाही तू जर राजेवाडी येथे आलास तर तुझ्या अंगावर टॅक्टर घालून जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली होती.
तसेच फिर्यादीचे चुलते नामे आजीनाथ वामन कुमटकर यांना तुम्ही जमीन का कसता म्हणून आम्हा दोघांना आरोपी 1) बिभीषण बळीराम कुमटकर, 2) सिद्ध वामन कुमटकर, 3) बाळनाथ सिद्धू कुमटकर, 4) ज्ञानदेव बाळनाथ कुमटकर सर्व रा राजेवाडी ता.जामखेड जि.अहिल्यानगर हे तेथे येवून तुम्ही बाबासाहेब याचे जमीनीची मशागत का करता असे म्हणून मला व माझे चुलते यांना शिविगाळ,दमदाटी केली आहे. तशी फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला फिर्यादी शिक्षक बाबासाहेब बळीराम कुमटकर यांनी दाखल केली होती.
दि. ११ रोजी राजेवाडी ता.जामखेड येथील अंकुश विठ्ठल निंबाळकर हे आजारी असल्याने फिर्यादी बाबासाहेब बळीराम कुमटकर भेटणे करीता गेले असता त्यांना भेट्न झाल्यानंतर सायंकाळी 07/30 वा. त्यांचे घरासमोर आलो असता.
आरोपी 1) अंगत सिदु कुमटकर 2.) बिभीषण बळीराम कुमटकर 3.) मोहीनी अंगत कुमटकर असे उभे होते ते मला म्हणाले की तु आमचे वर कशाला पोलीस स्टेशनला तक्रार केली असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरवात केली व म्हणाले की तुझ्याकडे आज पाहुन घेतो असे म्हणुन दमदाटी केली.
तेव्हा मी ताबडतोप सुनिल बाबुराव कुमटकर यांचे घरी गेलो म्हणुन माझी 1. अंगत सिदु कुमटकर 2. बिभीषण बळीराम कुमटकर 3. मोहीनी अंगत कुमटकर रा. राजेवाडी ता. जामखेड जि.अहिल्यानगर यांचे विरूध्द फिंर्याद आहे.
या घटनेमुळे राजेवाडी शिवारात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र सरोदे करत आहेत.