जामखेड शहरात दि १४ आक्टोबर बुधवारी चहाच्या टपरीवर तरुणाचा हात तोडल्याच्या गंभीर प्रकरणातील दोन संशयित आरोपींना जामखेड पोलिसांनी आष्टी येथून ताब्यात घेतले आहे. अमोल आबा पिसाळ आणि हरी बेद्रे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी रात्री सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास आष्टी परिसरातील एका शेतात असल्याची गुप्त माहिती मिळाली यानुसार जामखेड पोलीसांनी छापा टाकून दोघांना अटक केली या कारवाईमुळे हात तोडण्याच्या घटनेतील तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली आहे.
जामखेडमध्ये राहुल अंधारे याच्याशी संबंधित हात तोडण्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. गजबजलेल्या परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेतील आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. आष्टीतून मध्यरात्री दोघांना ताब्यात या प्रकरणाचा तपास करत असताना जामखेड पोलिसांनी आष्टी येथे शोधमोहीम राबवून अमोल आबा पिसाळ आणि हरी बेद्रे या दोघांना रात्री सुमारे बारा वाजता ताब्यात घेतले.
संबंधित गुन्ह्याबाबत आरोपींनी कबुली दिल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, या प्रकरणातील नेमकी भूमिका आणि इतर बाबी तपासातून स्पष्ट होणार आहेत.दोन्ही आरोपींना आज कर्जत न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयीन प्रक्रियेनंतर पुढील तपासाची दिशा स्पष्ट होईल.
दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची कारवाई ही कारवाई पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत एपीआय अजित मोरे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तू बेलेकर, ज्ञानेश्वर बेलेकर, गणेश साने आणि प्रकाश जाधव यांनी सहभाग घेतला.
जामखेड शहरातील या गंभीर घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून, हल्ल्यामागील नेमके कारण, घटनेतील इतर संभाव्य सहभागी आणि संबंधित बाबी तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शहरातील वाढत्या मारहाणीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. आरोपींविरुद्ध न्यायालयीन प्रक्रियेत पुढे काय घडते आणि तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, याबाबत उत्सुकता आहे.