Wednesday, March 25, 2026
Home क्राईम न्यूज जामखेड तालुक्यात धाडसी चोरी, चार लाखांचा मुद्देमाल लंपास

जामखेड तालुक्यात धाडसी चोरी, चार लाखांचा मुद्देमाल लंपास

0
2

जामखेड न्युज—–

जामखेड तालुक्यात धाडसी चोरी, चार लाखांचा मुद्देमाल लंपास

 

जामखेड तालुक्यातील वाघा येथे मंगळवारी रात्री साडेअकरा च्या सुमारास घराच्या किचनच्या दरवाजाचा कडी कोयंडा कशाच्यातरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश करुन बेडरुमधील लाकडी कापाटात ठेवलेले सोन्याचे, चांदिचे दागिणे व रोख रक्कम 3,96,500 रूपये किंमतीचा मुद्देमाल
घरफोडी करून चोरून नेला अशी फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जामखेड पोलीस स्टेशनला फिर्यादी अकाश रामदास बारसकर वय 26 वर्षे धंदा खाजगी नोकरी (आय.टी.इंजिनिअर), रा. वाघा, ता. जामखेड, जि.अहिल्यानगर यांनी समक्ष जामखेड पोलीस स्टेशनला हजर होवून र्फियाद लिहून देतो की, मी वाघा ता. जामखेड येथे वडील रामदास सोनबा बारसकर, आई संगिता रामदास बारसकर, पत्नी शुभांगी अकाश बारसकर असे आम्ही एकत्र राहणेस आहोत.

मी नोकरी निमित्त माझ्या पत्नीसह नरेगाव, ता.जि.पुणे येथे राहणेस आहे. माझे आई-वडील शेती करुन तसेच मी पुणे येथे खाजगी कंपनीमध्ये खाजगी नोकरी करुन कुटुंबाची उपजिवीका भागवितो.

काल दिनांक 24/03/2026 रोजी रात्री 11/30 वाजेच्या सुमारास आम्ही घरातील सर्वजन आमचे वाघा, ता.जामखेड, जि. अहिल्यानगर येथील राहते घरात दरवाजा, खिडक्या व्यवस्थित बंद करुन झोपलो होतो. बुधवारी पहाटे03/00 वाजेच्या सुमारास माझे वडील लघुशंकेसाठी उठून बाहेर जाण्यासाठी हॉलचा दरवाजा उघडण्यास गेले असता त्यांना दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांनी मला झोपेतून उठविल्याने मी पाहिले असता मला हॉलचा दरवाजा व किचनचा दरवाजा बाहेरील बाजूने बंद असल्याचा दिसला.

त्यामुळे आम्ही बेडरुमध्ये पाहिले असता बेडरुमधील लाकडी कपाटातील साहित्याची उचका पाचक करुन जमीनीवर अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यामुळे आम्ही कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या, चांदिच्या दागिण्याचा व रोख रकमेचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही.

यावरुन आमची खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात चोरट्याने आमचे राहते घराच्या किचनच्या दरवाजाचा कोयंडा कशाचे तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश करुन बेडरुमधील लाकडी कापाटात ठेवलेले सोन्याचे, चांदिचे दागिणे व रोख रक्कम अशी सुमारे 3,96.500 रुपये किंमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेले आहेत.

फिर्यादी आकाश रामदास बारस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली होती. तसेच कर्जत जामखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे व जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे हे करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!