Home ताज्या बातम्या सिताराम गडावर कवितांचा जागर! भूपाळ्या, पोवाडे अन् भारुडाच्या सुरांनी रंगली दिवाळी पहाट!...

सिताराम गडावर कवितांचा जागर! भूपाळ्या, पोवाडे अन् भारुडाच्या सुरांनी रंगली दिवाळी पहाट! आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार व शिवपट्टण प्रतिष्ठानचा अनोखा सांस्कृतिक उपक्रम; झुंजूमुंजू काव्य मैफिलीतून ग्रामीण संस्कृतीला उजाळा!

0
2
सिताराम गडावर कवितांचा जागर! भूपाळ्या, पोवाडे अन् भारुडाच्या सुरांनी रंगली दिवाळी पहाट!  आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार व शिवपट्टण प्रतिष्ठानचा अनोखा सांस्कृतिक उपक्रम; झुंजूमुंजू काव्य मैफिलीतून ग्रामीण संस्कृतीला उजाळा!

जामखेड न्युज – – – – – 

सिताराम गडावर कवितांचा जागर! भूपाळ्या, पोवाडे अन् भारुडाच्या सुरांनी रंगली दिवाळी पहाट!

आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार व शिवपट्टण प्रतिष्ठानचा अनोखा सांस्कृतिक उपक्रम, झुंजूमुंजू काव्य मैफिलीतून ग्रामीण संस्कृतीला उजाळा!

 

दिवाळीच्या मंगलमय पहाटे कविता, भूपाळ्या, पोवाडे, भारुड आणि भक्तिगीतांच्या सुरेल सादरीकरणाने ऐतिहासिक सिताराम गड परिसर काव्यमय झाला. आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, खर्डा आणि शिवपट्टण ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवपट्टण झुंजूमुंजू काव्य मैफिल, संगीतमय दिवाळी पहाट’ हा अनोखा उपक्रम उत्साहात पार पडला.

पहाटे साडेपाच वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन महालिंग महाराज नगरे, प्रांताधिकारी प्रतिभा भुते व सहायक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

या मैफिलीत बाबासाहेब राजगुरू, सविता गोलेकर, मंगला शिंगाणे, गंगाबाई जायभाय यांच्यासह विविध कवी व कलावंतांनी कविता, पोवाडे, भारुड आणि भक्तिगीतांचे सादरीकरण केले. आई, शेतकरी, महिला जीवन आणि सामाजिक प्रश्नांवरील कवितांनी उपस्थितांची मने जिंकली. तर भक्तिगीते आणि लोककलांनी वातावरण भक्तिमय केले.

ग्रामीण भागातील हरवत चाललेल्या ओव्या, भूपाळ्या आणि लोककला यांना नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात साहित्यप्रेमी, महिला, युवक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सहभागी कवी व कलावंतांचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविक संतोष थोरात यांनी केले. सूत्रसंचालन महालिंग कोरे व शशिकांत वैद्य यांनी केले, तर आभार ज्ञानेश्वर नगरे यांनी मानले.

पहाटेच्या प्रसन्न वातावरणात रंगलेली ही काव्यमैफल ग्रामीण साहित्य, लोककला आणि संस्कृतीचा अनोखा जागर ठरली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!