Wednesday, March 25, 2026
Home ताज्या बातम्या खेलो इंडिया नॅशनल मल्लखांब स्पर्धेसाठी जामखेडच्या ज्ञानेश्वरीची धनवेची निवड श्री शंभुसूर्य...

खेलो इंडिया नॅशनल मल्लखांब स्पर्धेसाठी जामखेडच्या ज्ञानेश्वरीची धनवेची निवड श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा

0
2

जामखेड न्युज—–

खेलो इंडिया नॅशनल मल्लखांब स्पर्धेसाठी जामखेडच्या ज्ञानेश्वरीची धनवेची निवड

श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा

 

जामखेड येथील श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेची मल्लखांबपट्टु कु.ज्ञानेश्वरी नितीन धनवे हिने मुलींच्या गटात अंबिकानगर, छत्तीसगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. यामुळे तिच्या वर व प्रशिक्षण संस्थेचे अभिनंदन करण्यात येत आहे.


छत्तीसगढ येथे होणाऱ्या खेलो इंडिया ट्रायबल नॅशनल मल्लखांब गेम्ससाठी, श्री शंभसूर्यच्या ज्ञानेश्वरीची धनवेची निवड आज मंगळवार दिनांक १७-३-२०२६ रोजी इंद्रायणी स्पोर्ट्स ॲकॅडमी, तळेगाव दाभाडे येथे झालेल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स-मल्लखांब महाराष्ट्र संघ निवड चाचणी स्पर्धा पार पडली.


या स्पर्धेत जामखेडच्या श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेची मल्लखांबपट्टु कु.ज्ञानेश्वरी नितीन धनवे हिने मुलींच्या गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून २ ते ४ एप्रिल २०२६ दरम्यान अंबिकानगर, छत्तीसगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.


ज्ञानेश्वरीला यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य प्रशिक्षक श्री संतोष (बबलु वस्ताद) टेकाळे, प्रशिक्षक अमोल निमोणकर, अहिल्यानगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच तांत्रिक समितीचे सर्व सदस्य यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

तसेच श्री शंभुसूर्य आखाड्याच्या सर्व कार्यकारिणीने पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!