अशोक खरातने 5 नरबळी दिले? पेन ड्राईव्हमध्ये तब्बल 100 व्हिडीओ, महाराष्ट्राला हादरवणारी माहिती
नाशिकमधील भोंदूगिरी आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने आता अत्यंत भयानक वळण घेतले आहे. स्वतःला सिद्ध पुरुष म्हणवून घेणारा 67 वर्षांचा अशोक खरात हा केवळ महिलांचे शोषणच करत नव्हता, तर त्याने 5 जणांचा नरबळी दिल्याचा खळबळजनक संशय सरकारी वकिलांनी न्यायालयात व्यक्त केला आहे.
अशोक खरात याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे, त्याला पुन्हा पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, त्यामुळे आता अशोक खरात याच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी खळबळजनक दावा केला आहे.
अशोक खरातने 5 नरबळी दिल्याचा संशय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सरकारी वकिलांच्या दाव्यानं खळबळ उडाली आहे. एका पीडित महिलेनं भोंदू जोतिषी अशोक खरात विरोधात अत्याचाराची तक्रार दाखल केली आणि हे संपूर्ण धक्कादायक प्रकारण समोर आलं आहे. अशोक खरातचं बिंग फुटलं.
पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केलेल्या पेन ड्राईव्हमध्ये तब्बल 100 व्हिडीओ सापडले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आज अशोक खरात याची पोलीस कोठडी संपल्यानं त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी सरकारी वकिलांकडून धक्कादायक दावा करण्यात आला आहे.
नेमकं काय म्हटलं सरकारी वकिलांनी?
अशोक खरातच्या घराची झडती घेण्यात आली, त्याने बंदुकीच्या माध्यमातून 5 नरबळी दिल्याचा संशय आहे. त्याचे पुरावे मिळाले आहेत. त्याच्या मालमत्तासंबंधित कागदपत्रे मिळाले आहेत, अनेकांना त्याने फसविले आहे, त्याच्याविरोधात अनेक तक्रारी पुढे येत आहेत.
झडतीच्यावेळी पिस्टल जप्त करण्यात आलं असून, त्याने याच पिस्टलच्या माध्यमातून 5 जणांचा नरबळी दिल्याचा संशय आहे. या प्रकरणात अत्याचाराचे काही व्हिडीओ समोर आले असून, आरोपी हा 67 वर्षांचा आहे, तो या व्हिडीओमध्ये 30 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करतांना दिसतो, असा दावा वकिलांनी केला आहे.
हरणाची शिकार केल्याचा देखील संशय
दरम्यान आरोपी अशोक खरात याने अनेकांना कस्तुरी दिली असल्याची देखील माहिती समोर येत आहे. या कस्तुरीसाठी त्याने हरणाची शिकार केल्याचा संशय आहे. तो साप कुठून आणत होता, याचा देखील तपास करायचा आहे, लैंगिक अत्याचार प्रकरणात डिजिटल पुरावे जमा करायचे आहेत, त्यामुळे त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावणी आहे.
या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 30 वर्षांच्या महिलेचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून सुरू झालेला हा तपास आता थेट मानवी बळी आणि वन्यजीव शिकारीपर्यंत पोहोचल्याने संपूर्ण राज्य हादरले आहे.
सिद्ध पुरुषाच्या नावाखाली शोषणाचा काळा खेळ अशोक खरात याने नाशिकमध्ये आपले एक जाळे विणले होते. तो महिलांना अंगावर टाकण्यासाठी खडे आणि खाण्यासाठी पेढे देत असे. तसेच पिण्याच्या पाण्यात गुंगीचे अमली पदार्थ मिसळून महिलांना अस्वस्थ केले जायचे. जेव्हा महिलांची शुद्ध हरपायची किंवा त्यांना मळमळ व्हायची, तेव्हा त्यांच्या हतबलतेचा फायदा घेऊन खरात त्यांचे लैंगिक शोषण करत असे.
धक्कादायक बाब म्हणजे 67 वर्षांचा हा आरोपी 30 वर्षांच्या तरुण महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार करत होता. त्याच्या फार्म हाऊसवरून पोलिसांना 6 लाख 53 हजार रुपयांची रोकड, लॅपटॉप आणि एक काळ्या रंगाचे रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहे. या रिव्हॉल्व्हरवर चक्क राजमुद्रा कोरलेली असून त्यासोबत 31 जिवंत काडतुसेही सापडली आहेत.