जामखेड न्युज—–
सागर मोहळकर वरील गोळीबार प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
जामखेड गोळीबारातील आरोपींना लवकरच अटक करणार – प्रविणचंद लोखंडे

जामखेड शहरातील न्युरानी काँलनी येथे काल बुधवार दि. ४ रोजी सायंकाळी सात साडेसात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती यात कुख्यात गुंड सागर मोहळकर गंभीर जखमी झाला होता. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देत योग्य त्या सूचना दिल्या होत्या.

गोळीबाराच्या घटनेनंतर आज सागर मोहळकर चे वडील किसन चांगदेव मोहळकर वय ६२ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जामखेड पोलीस स्टेशनला अज्ञाताविरोधात कलम 109 (1 ) शस्त्र अधिनियन 1959 चे कलम 3 /25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मध्ये म्हटले आहे की, सागर मोहळकर यास कोणीतरी अज्ञात इसमांनी (नाव व पत्ता माहित नाही) मोटरसायकलवर येऊन अज्ञात कारणासाठी, जिवे ठार मारण्याचे उद्देशाने बंदुकीने गोळीबार करुन त्यास गंभीर जखमी केले आहे, वगैरे मजकुराचे फिर्यादी वरुन गुन्हा रजि दाखल करण्यात आली आहे.
चौकट
जामखेड गोळीबारातील आरोपींना लवकरच अटक करणार – प्रविणचंद लोखंडे
बुधवार दि. ४ मार्च रोजी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास सागर मोहळकर यांच्या वर गोळीबार करण्यात आला होता. यात तो गंभीर जखमी झालेला होता. या घटनास्थळी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी भेट देत आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश दिले त्या अनुषंगाने कर्जत जामखेड चे उपविभागीय अधिकारी प्रविणचंद लोखंडे तळ ठोकून असून अनेकांची चौकशी करत आहेत.






