Home ताज्या बातम्या अतिक्रमण हटाव साठी सर्व पक्षीय व संघटनांच्या वतीने उद्यापासून जामखेड बेमुदत बंद...

अतिक्रमण हटाव साठी सर्व पक्षीय व संघटनांच्या वतीने उद्यापासून जामखेड बेमुदत बंद नेते व्यस्त, अधिकारी स्वस्थ, जामखेडकर मात्र धुळीने व खाचखळग्याने त्रस्त

0
8

जामखेड न्युज—–

अतिक्रमण हटाव साठी सर्व पक्षीय व संघटनांच्या वतीने उद्यापासून जामखेड बेमुदत बंद

नेते व्यस्त, अधिकारी स्वस्थ, जामखेडकर मात्र धुळीने व खाचखळग्याने त्रस्त

 

राष्ट्रीय महामार्ग कामाची अनियमितता व अतिक्रमणे याबाबत सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी उपोषण सुरु केले होते. तेव्हा राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, नगरपरिषद, पोलीस प्रशासन व ठेकेदार यांनी पाच तारखेपासून हद्द निश्चितीच्या कामाला सुरुवात करण्याचे लेखी दिले होते तेव्हा चा जामखेड बंद मागे घेऊन साखळी उपोषण सुरु केले होते. या साखळी उपोषणाला मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, नगर सकल मराठा समाजाचे नेते यांनी भेटी देत पाठिंबा दर्शवला होता. तसेच सभापती प्रा राम शिंदे यांनी नियमानुसार अतिक्रमणे हटवली जातील असे सांगितले होते तरीही आता अधिकारी टोलवाटोलवी करत आहेत. यामुळे सर्व पक्षीय व संघटनांच्या वतीने उद्यापासून जामखेड बंद चे निवेदन देण्यात आले आहे.

सुज्ञ नागरिकांच्या मते राज्यात वजन असणारे
जामखेडचे सभापती प्रा राम शिंदे, आमदार रोहित पवार, खासदार निलेश लंके हे अतिक्रमणाबाबत कठोर भूमिका का घेत नाहीत. त्यांना जामखेड कडे लक्ष देण्यास वेळ नाही का? त्यांना अतिक्रमण धारकांना दुखवायचे नाही असे दिसते. यामुळे
नेते व्यस्त, अधिकारी स्वस्थ, जामखेडकर मात्र त्रस्त अशीच अवस्था झाली आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे डेप्युटी इंजिनियर सुजित चेमटे यांनी दि. ५ मार्च २०२६ पर्यंत महामार्गाची अधिकृत हद्द निश्चित करून कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर दि. २६ फेब्रुवारी रोजीचा जामखेड बंद मागे घेतल्यानंतरही दिलेल्या आश्वासनानुसार अतिक्रमण काढण्यासाठीची कोणतीही प्रक्रिया न केल्याने मागे घेतलेले जामखेड बंदचे आंदोलन पुन्हा पुकारले असून राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता सुजित चेमटे व संबधीत वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत हद्द निश्चित करत नाहीत तोपर्यंत उद्या दि. ६ मार्चपासून सर्व पक्षीय व सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीने बेमुदत बंद पुकारात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

जामखेड शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी जामखेड जिल्हा अहिल्यानगर वरील शहरातील रस्त्याच्या कामाला कायमस्वरूपी, अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्यासाठी. दि. २६ मार्च २०२६ पासून अतिक्रमण बाबत अंतिम कार्यवाही होईपर्यंत सर्व पक्षीय जामखेड शहर बेमुदत बंद ठेवण्यात येणार होता मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता सुजित चेमटे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर जामखेडबंद मागे घेण्यात आला होता.

गेली साडेतीन वर्षांपासून जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. ते अनेक अडथळे व कासव गतीने सुरू आहे. यामुळे अनेक छोटे मोठे अपघातही झाले आहेत. यामधे अनेक जण जायबंदी तर काहींना आपले जीव गमवावे लागले आहेत. हे काम सुरू असताना अनेक अडचणींबरोबरच अतिक्रमण काढणे हा मोठा अडथळा ठरत आहे. यासाठी विविध पक्षसंघटनांकडून अनेक आंदोलने तर प्रशासकीय पातळीवर अनेक बैठका. तसेच जिल्हाधिकारी यांनी याठिकाणी प्रत्यक्ष भेटू देऊन अतिक्रमण काढण्याच्या सुचना करूनही काहीच होत नसल्याने अखेर जामखेडकरांनी अखेर सर्वपक्षीय व बेमुदत जामखेड बंदचे हत्यार उपसले होते.

त्याच अनुषंगाने जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५४८डी मार्गावरील अतिक्रमणाच्या प्रश्नावरून सर्व पक्षीय व सामाजिक संघटनांनी काही दिवसापूर्वी पुकारलेला बेमुदत बंद स्थगित करण्यात आला होता. मात्र सर्व पक्षीय साखळी उपोषण सुरू राहणार ठेवण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज दि. ५ मार्च रोजी निर्धारित मुदतीत हद्द निश्चित न झाल्याने उदया शुक्रवार दि.६ मार्च पासून सर्व पक्षीय व सामाजिक संघटनानी जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५४८- डी मार्गात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणा मुळे जामखेड शहर बेमुदत बंद पुकारला आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता चेमटे यांनी ५ मार्च २०२६ पर्यंत महामार्गाची हद्द निश्चित करण्याचे लेखी दिले होते. परंतू हद्द निश्चितीची कोणतेही प्रक्रिया न झालेमुळे राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री. चेमटे यांनी व संबधीत वरिष्ठ अधिकारी हद्द निश्चित करत नाहीत तोपर्यंत शुक्रवार दि ५ मार्च २०२६ रोजी पासुन सर्व पक्षीय व सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीने बेमुदत बंद पुकाराला आहे. तरी सर्व व्यापारी, ग्रामस्थ व पत्रकार बांधव यांनी शहर विकासासाठी सहकार्य करावे असेही आवाहन आंदोलकांकडून करण्यात आले आहे.

निवेदनावर अमित चिंतामणी, पोपट राळेभात,
राहुल उगले, विकास राळेभात, अँड. मयूर डोके, सुरेश भोसले, प्रा. विकी गायतडक, प्रदीप टाफरे, कुंडल राळेभात, प्रविण मुळे, दिपक घायतडक, अनिल सदाफुले, सुर्यकांत सदाफुले, शहाजी राळेभात, उमेश राळेभात, बाबासाहेब चंदन यांच्या सह अनेकांच्या सह्या आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!