Monday, September 21, 2026
Home ताज्या बातम्या गणेशोत्सवानिमित्त हिंदक्रांती मित्र मंडळाचा महिलांसाठी विविध स्पर्धांचा रंगतदार मेळावा शिवाजीनगरमध्ये उखाणे,...

गणेशोत्सवानिमित्त हिंदक्रांती मित्र मंडळाचा महिलांसाठी विविध स्पर्धांचा रंगतदार मेळावा शिवाजीनगरमध्ये उखाणे, टिकली लावणे, बिस्कीट खाणे, स्लो सायकलसह विविध स्पर्धांचा समावेश

0
2
गणेशोत्सवानिमित्त हिंदक्रांती मित्र मंडळाचा महिलांसाठी विविध स्पर्धांचा रंगतदार मेळावा  शिवाजीनगरमध्ये उखाणे, टिकली लावणे, बिस्कीट खाणे, स्लो सायकलसह विविध स्पर्धांचा समावेश

जामखेड न्युज – – – – – 

गणेशोत्सवानिमित्त हिंदक्रांती मित्र मंडळाचा महिलांसाठी विविध स्पर्धांचा रंगतदार मेळावा

शिवाजीनगरमध्ये उखाणे, टिकली लावणे, बिस्कीट खाणे, स्लो सायकलसह विविध स्पर्धांचा समावेश

गणेशोत्सवानिमित्त शिवाजीनगर, जामखेड येथील हिंदक्रांती मित्र मंडळाच्या वतीने विविध मनोरंजनात्मक आणि कौशल्याधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासोबतच महिला व नागरिकांना आपल्या कलागुणांना वाव मिळावा, हा उद्देश असल्याचे मंडळाच्या उपक्रमातून दिसून येत आहे.

रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी विविध आकर्षक स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या मोठ्या उत्साहात फनी गेम संपन्न झाल्या


यामध्ये महिलांसाठी उखाणे स्पर्धा, महिलांसाठी विशेष स्पर्धा, टिकली लावण्याची स्पर्धा, तसेच बिस्कीट खाण्याची स्पर्धा अशा मनोरंजनात्मक स्पर्धांचा समावेश होता याशिवाय स्लो सायकल स्पर्धा आणि विविध गुणदर्शन स्पर्धा (वैयक्तिक स्पर्धा) देखील आयोजित करण्यात आल्या होत्या.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत विविध वयोगटातील नागरिकांना सहभागी होता येणार असून, सहभागींच्या उत्साहाला प्रोत्साहन देण्यासाठी विजेत्यांना योग्य ते बक्षीस देण्यात आले.

कार्यक्रमाच्या ठिकाणी लिंबू चमचा स्पर्धा, संगीत खुर्ची यांसारख्या स्पर्धांचाही समावेश करण्यात आला होता. त्यामुळे गणेशोत्सवाच्या धार्मिक वातावरणासोबतच मनोरंजन, कला आणि स्पर्धात्मक उत्साहाची पर्वणी नागरिकांना अनुभवता आला
शिवाजीनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!