जामखेड न्युज—–
जामखेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
शहरात ड्रग्ज तर तालुक्यातील एका ठिकाणी दुध भेसळीचा पर्दाफाश

जामखेड शहरात आज स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत एका ठिकाणी १० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले असून फक्राबाद येथे केमिकल मिसळून दूध तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बडे मासे फासाला लागणार की थातूर मातूर कारवाई करत बडे मासे सोडवले जाणार हीच चर्चा सध्या परिसरात सुरू आहे.

जामखेड शहरात नशायुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री सुरू असते अनेक बळी यामुळे गेले आहेत. आज याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जामखेड शहर व तालुक्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई करत १० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले असून फक्राबाद येथे केमिकल मिसळून दूध तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.दोन्ही गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना मिळालेल्या गुप्तमाहितीच्या आधारे जामखेड शहरात छापा टाकण्यातआला.
या कारवाईत संशयिताकडून अंदाजे १० ग्रॅमएमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला.संबंधित व्यक्तीविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, तालुक्यातील फक्राबाद येथे सुरू असलेल्या दूधभेसळ प्रकरणावरही पोलिसांनी धडक कारवाई केली.केमिकल व इतर पदार्थांचा वापर करून कृत्रिम दूध तयार करून विक्री केली जात असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळा वरून साहित्य जप्त करून संबंधितांवर गुन्हा नोंदवला आहे.




