कै. दत्तात्रय एकनाथ अडसुळ यांच्या स्मरणार्थ श्री साकेश्वर मंदिरातील शिवलिंगास अकरा किलो चांदीचा जलधारी
जामखेड तालुक्यातील साकत येथील मुळ रहिवाशी व सध्या बुलढाणा येथे स्थायिक असलेले अडसुळ कुटुंब हे निस्सीम साकेश्वर महाराजांचे भक्त यातचदत्तात्रय एकनाथ अडसुळ यांचे नोव्हेंबर महिन्यात निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी श्री साकेश्वर मंदिरातील शिवलिंगास अकरा किलो वजनाचा चांदीचा (अरघा) जलधारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत महाशिवरात्रीच्या पुर्वसंधेला प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
शिवलिंगास अकरा किलो वजनाचा चांदीचा (अरघा) जलधारी प्रतिष्ठापना करताना कै. दत्तात्रय एकनाथ अडसूळ यांच्या पत्नी गंगुबाई अडसुळ, मुलगा गजानन अडसुळ आणि विजय अडसुळ, गजानन यांचे दोन मुले अनिकेत व धनंजय, विजय यांचा मुलगा अभिषेक व मुलगी रेणुका तसेच ह.भ.प. उत्तम महाराज वराट,साकतचे उपसरपंच राजाभाऊ वराट, रामहरी वराट, महादेव वराट (पोलीस पाटील), काकासाहेब वराट, दीपकअडसुळ, हरितमित्र रामभाऊ मुरूमकर, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल वराट, रमेश अडसुळ, बंडू भालेराव सह साकत,कोल्हेवाडी, पिंपळवाडी आणि कडभनवाडी ग्रामस्थ नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अडसूळ कुटुंबियांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
दत्तात्रय एकनाथ अडसुळ यांनी साकत मध्ये शेती बरोबर कपडे शिवणकाम व्यवसाय केला नंतर त्यांनी साकत सोडले व बुलढाणा येथे किराणा दुकान सुरू केले. मोठ्या चिकाटीने व्यवसाय करत बुलढाणा येथे नावलौकिक मिळवला आज बुलढाणा येथे आडत, किराणा हे व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू आहेत. त्यांच्या दातृत्वाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
महाशिवरात्रीला श्री साकेश्वर महाराज देवस्थान येथे मोठ्या प्रमाणात रूद्राभिषेक तसेच पालखी सोहळा असतो. महाशिवरात्रीच्या पुर्वसंधेला जलधारी बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले. ग्रामदैवत श्री साकेश्वर महाराज देवस्थान हे परिसरात श्रद्धास्थान मानले जाते. अनेक वर्षांपासून येथे अखंड पूजा-अर्चा, धार्मिक विधी आणि वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गावातील प्रत्येक कुटुंबाचे या देवस्थानाशी भावनिक नाते जोडलेले असून कोणतेही शुभकार्य करण्यापूर्वी येथे दर्शन घेण्याची परंपरा आहे.
दरवर्षी महाशिवरात्री निमित्त मंदिरात पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात होते. काकड आरतीनंतर रुद्राभिषेक, पंचामृत अभिषेक अशा विविध विधी पार पडतात. वेदमंत्रांच्या उच्चारांनी आणि ‘हर हरमहादेव’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. दिवसभर भजन-कीर्तन,अभंग गायन आणि हरिपाठाचे आयोजन केलेजाते.
मिरवणूक, पूजाविधी आणि जलधारी प्रतिष्ठापना सोहळा
महाशिवरात्री निमित्त सकाळी साकत गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.ढोल-ताशांच्या गजरात आणि हरिनामाच्या घोषात चांदीची जलधारी मंदिरात आणण्यात आली. वेदमंत्रांच्या साक्षीने शिवलिंगावर ११ किलो चांदीच्या जलधारीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी रुद्राभिषेक,महाआरती, अभंग – भजन यांचे आयोजन करण्यात आले होते.