जामखेड न्युज—–
भाग्यश्री गोरे लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत तालुका कृषी अधिकारीपदी निवड
सावरगाव, जामखेड, कर्जत परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव

जामखेड तालुक्यातील सावरगावची कन्या कु. भाग्यश्री उषा जयवंत गोरे हीची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत तालुका कृषी अधिकारी ( Class – 2 ) या पदी निवड झाली आहे.तिच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भाग्यश्री चे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा कर्जत येथे झाले असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण कन्या विद्या मंदिर कर्जत व महात्मा गांधी जुनियर कॉलेज येथे झाले तर पदवीचे शिक्षण नाशिक येथील के. के. वाघ महाविद्यालयात (Bsc. Agriculture) पूर्ण केले.
ग्रामीण भागातून येत कठोर परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे.

भाग्यश्री चे वडील आरटीओ कार्यालयात काम करत असून चुलते अशोक गोरे शेतकरी यांनीही, मोठ्या कष्टाने व त्यागाने त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी दिलेले पाठबळ निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या संघर्षाला आणि कुटुंबाच्या योगदानालाही मनःपूर्वक सलाम व अभिनंदन




