जामखेड च्या कुख्यात गुंडांची नाशिकच्या कारागृहात हद्दपारी
जामखेड तालुक्यातील सारोळा येथील कुख्यात गुंडांवर पुणे जिल्ह्यातील दत्तवाडी, पुणे शहर तसेच जामखेड पोलीस स्टेशनला वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामुळे जामखेड पोलीसांनी त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर कडे पाठवला होता याला जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे यामुळे कुख्यात गुंडांची नाशिकच्या कारागृहात हद्दपारी करण्यात येणार आहे.
सन २०१५ ते २०२४ या कालावधीत पुणे दत्तवाडी आणि जामखेड पोलिस स्टेशनमध्ये पाच गंभीर गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार (वय ३२, रा. सारोळा, ता. जामखेड, जि. आहिल्यानगर) याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. मा. जिल्हाधिकारी आहिल्यानगर यांच्या आदेशानुसार (के.डी.सी/कार्या.९ क १८३२/२०२५, दि. २७ मार्च २०२५) त्याला ९ फेब्रुवारी २०२६ रोजी पुण्यातून ताब्यात घेऊन १० फेब्रुवारी रोजी मध्यवर्ती कारागृह नाशिकला रवानगी करण्यात आली.
या गुंडाने वैयक्तिक व साथीदारांच्या मदतीने अग्नीशस्त्रासह सरकारी नोकरांना शासकीय कामापासून परावृत्त करण्यासाठी जीवे मारण्याचा प्रयत्न केला (०१), जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदी आदेश मोडले (०१), व्याज वसुलीसाठी अपहरण करून लपवून ठेवले व दुखापत केली (०१), घातक शस्त्रासह जबरी चोरी करत दुखापत केली (०१), तसेच महामार्गावर घातक शस्त्रासह जबरी चोरीसाठी गंभीर दुखापत केली (०१). जामिनावर सुटताच पुन्हा गुन्हेगारी सुरू ठेवत लोकांमध्ये दहशत निर्माण करत होता.
जामखेड पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषध गुन्हेगार, व्हिडिओ पायरेसी व काळाबाजार करणाऱ्यांच्या विघटनाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र १९८१ चा ५५ कलम ३(३) अंतर्गत कारवाई केली.
पोलिस आयुक्त आहिल्यानगर यांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. सदरची कारवाईचे नेतृत्व पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्गे , उपविभागीय पोलिस अधिकारी प्रविण लोखंडे व स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पोलीस उपनिरीक्षक पुष्कर कडू, पो.हे.कॉ. तुकाराम बी. सोनवणे, पोलीस नाईक जितेंद्र सरोदे, पोलीस नाईक रविंद्र वाघ, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शेकडे, पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप घोळवे, पोलीस कॉन्स्टेबल दतू बेल्हेकर, चालक सहा. फौज, हनुमान आरसुळ सर्व नेमणुक जामखेड पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार रविंद्र पांडे, पो.हे.कॉ. राम माळीयांनी केली आहे.