आरक्षित तलावातील विद्युत मोटर बंद आदेशाला न जुमानता हातात तलवार घेऊन महिला व ग्रामस्थांमध्ये दहशत
जामखेड तालुक्यातील कोल्हेवाडी येथील घटना
टंचाईच्या काळात प्रशासनाच्या आदेशानुसार तलावातील पाणी आरक्षित करण्याचे आदेश असतानाही या आदेशाला न जुमानता आरोपी आदेश बळिराम सरोदे यांने महिला व ग्रामस्थांना शिवीगाळ करत हातात तलवार घेत दहशत निर्माण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला वरील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड तालुक्यातील साकत ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कोल्हेवाडी येथील पाझर तलाव नं २ येथील पाणीसाठा उन्हाळ्यात उपयोगी यावा म्हणून शेतीच्या सर्व विद्युत मोटारी बंद कराव्यात तसा ग्रामपंचायत मध्ये ठराव घेतला तरीही काही तरुणांनी आपल्या मोटारी बंद केल्या नाहीत यानंतर तहसीलदार यांना निवेदन दिले तरीही आदेश बळीराम सरोदे याची विद्युत मोटार सुरूच होती म्हणून सोमवार दि. ९ रोजी सकाळी दहाचे सुमारास २५ महिला व पुरुष ग्रामस्थ तलाव परिसरात जमले होते. फिर्यादी राजेंद्र कोल्हे यांनी आरोपीस सदर पाणी आरक्षित करावयाचे असल्याने तुमची विद्यत मोटार चालू करू नका असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपी आदेश सरोदे याने तलवार घेऊन महिलांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली तसेच तलावात पाण्याचा थेंबही ठेवणार नाही असे म्हणत शिवीगाळ करत दहशत पसरवली.
या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य फिर्यादी राजेंद्र ग्यानबा कोल्हे वय ५५ रा. कोल्हेवाडी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी आदेश बळीराम सरोदे वय रा कोल्हेवाडी यांच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस काँन्स्टेबल रवींद्र वाघ हे करत आहेत.
तसेच सदरचा पाणी साठयाचा उपसा करू नये म्हणुन साकत ग्रामपंचायत यांनी दिनांक ३०/१२/२०१४ रोजी ठराव नं. ०७ अन्वये सर्वानुमते मंजुर केलेला आहे तसेच ग्रामपंयालय सदस्य यांनी दिनांक २३/०१/२०१६ रोजी मे तहसिलदार साहेब मौजे कोल्हेवाडी येथील सदर ठिकाणचा पाणी उपसा करू नये म्हणुन लेखी निवेदन दिलेले होते.
सदर ठिकाणची विदयुत इलेक्ट्रीक मोटार काढून घेणार नाही माझे मोटारीस कोणी हात लावल्यास त्यांचे कुटुंबाचा बिमोड करून टाकील अशी धमकी दिली म्हणून आदेश सरोदे यांच्या विरुध्द आमची रितसर कायदेशीर फिर्याद असुन तीची चौकशी होवून सदरच्या गुंड प्रवृत्ती च्या इसमावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कोल्हेवाडी रामनगर नागरिकांनी केली होती. यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदेश सरोदे हा आडदांड व नंगड प्रवृत्तीचा असुन त्यांचा खुपमोठा जोड जमाव आहे तसेच याला राजकीय पाठबळ असुन त्याचा मामा पुणे येथे वकीली करीत आहे त्यामुळे सदरचा इसम कधी काय करील याचा भरवसा राहिलेला नाही त्याचे पासुन आमचे व आमचे कुटुंबियांचे जिवीतास धोका निर्माण झालेला आहे.असे निवेदनात म्हटले होते.
पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस काँन्स्टेबल रवींद्र वाघ हे करत आहेत.