जामखेड न्युज——
जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणाबाबत नगरपरिषद अँक्शन मोडवर
अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले, नगरपरिषदेमार्फत नोटीसा
जिल्ह्यातील व परिसरातील सर्व अतिक्रमणे काढण्यात आली फक्त जामखेड शहरातील लहान मोठे अतिक्रमणे काढली पण मोठ मोठे अतिक्रमणे तसीच आहेत. याबाबत अवधुत पवार यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने अतिक्रमण हटविण्यासाठी उपोषण आंदोलन केले होते. शहरातील अतिक्रमणे न हटवता राष्ट्रीय महामार्ग रस्ता सुरू करण्यात आला तसेच गटारावर टपऱ्या बांधून भाड्याने दिलेल्या आहेत. शहरातील पाईपलाईन कोठून जाणार असा प्रश्न निर्माण झाला होता. आता नगरपरिषद जामखेड यांनी अतिक्रमण धारकांना नोटीसा बजावल्या आहेत.

नोटीस मिळाल्यापासून सात दिवसात अतिक्रमण काढून घ्याव्येत अन्यथा अतिक्रमण हटविण्याचा खर्च संबधित अतिक्रमण धारकांना करावा लागेल यामुळे अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहेत. आता अतिक्रमणे निघणार का हे पाहणे आवश्यक आहे.
जामखेड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी वरील जामखेड ते सौताडा या रस्त्याच्या हद्दीत तथा रस्त्या लगत नगरपरिषद कार्यालयाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता नियमबाह्य बांधकाम / अतिक्रमण केलेले आहेत.

जामखेड ते सौताडा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८ डी हा रस्ता जामखेड शहराच्या हद्दीतून जात असून हा रस्ता शहराच्या विकास योजना रस्ते मध्ये समाविष्ट आहे. तसेच नगरपरिषद हद्दीत पाणीपुरवठा योजना व भुयारी गटार योजनेचे काम चालू होणार आहे.

जामखेड ते सौताडा रस्ता राष्ट्रीय महामार्गलगत दोन्ही बाजूच्या स्टॉर्म वॉटर लाईन (नाली) पासून ३ मिटरच्या अंतर्गत येणारे सर्व बांधकाम अनधिकृत असून कार्यालयाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता नियमबाह्य बांधकाम/ अतिक्रमण केलेले आहे.
तरी सदरचे अनाधिकृत/नियमबाह्य बांधकाम ही नोटीस मिळाल्यापासून सात (७) दिवसाच्या आत काढून घ्यावे व संबंधित कार्यन्वयन यंत्रणेला यथोचित सहकार्य करावे.







