शाळेत वैज्ञानिकांच्या जयंत्या साजऱ्या कराव्यात – गटविकास अधिकारी शुभम जाधव मोहा येथे ४९ व्या तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनाचा समारोप उत्साहात संपन्न
शाळेत वैज्ञानिकांच्या जयंत्या साजऱ्या कराव्यात – गटविकास अधिकारी शुभम जाधव
मोहा येथे ४९ व्या तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनाचा समारोप उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांसाठी त्यांचे वैज्ञानिक ज्ञान आणि सर्जनशीलता प्रदर्शित करण्यासाठी प्रदर्शन एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे. ही प्रदर्शने विद्यार्थ्यांना त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना आणि शोध लोकांसमोर मांडण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतात. तंत्रज्ञानामुळे सर्व गोष्टी अधिक कार्यक्षम बनवल्या आहेत. विज्ञान क्षेत्रात संशोधनाच्या व रोजगाराच्या संधी अमर्याद असल्याचे सांगितले हे करताना पर्यावरण रक्षण महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना वैज्ञानिकांची माहिती मिळावी म्हणून आपण त्यांची जयंती कार्यक्रम शाळेत साजरे करावेत यावेळी वक्तृत्व स्पर्धा घ्याव्यात असे आवाहन गटविकास अधिकारी शुभम जाधव यांनी केले.
जामखेड तालुकास्तरावरील गणित, विज्ञान व पर्यावरण प्रदर्शनाच्या ४९ व्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून व्यक्त केले. प्रदिपकुमार महादेव बांगर व श्री देविचंद वामनराव डोंगरे उच्च माध्यमिक विद्यालय मोहा येथे समारोप व बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी शुभम जाधव प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी अधिकारी विजय शेवाळे, सांख्यिकी विस्तार अधिकारी कैलास खैरे, मुख्याधिकारी अजय साळवे, बबन काका काशिद, घनश्याम भोसले, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दशरथ कोपनर, दत्ता काळे, शंकर खताळ, मधुकर बोराटे, संतोष चव्हाण, भगवानबाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष देविचंद डोंगरे, सचिव ज्ञानदेव बांगर, खजिनदार महादेव बांगर, सदस्या सुशिला डोंगरे, लता बांगर, केंद्रप्रमुख केशव गायकवाड, सुरेश मोहिते, नवनाथ बडे, राम निकम, गणित संघाचे अध्यक्ष इथापे, विज्ञान संघाचे अध्यक्ष बाजीराव गर्जे, जिल्हा सदस्य बबन राठोड, यांच्या सह अनेक मान्यवर शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
गणित विज्ञान प्रदर्शनाचा आज तिसऱ्या दिवशी समारोप झाला यावेळी महादेव बांगर, ज्ञानदेव बांगर, अजय साळवे मुख्याधिकारी यांनी आपले मनोगते व्यक्त केले.
या विद्यार्थ्यांनी पटकावले क्रमांक
पहिली ते पाचवी विज्ञान प्रथम क्रमांक अर्णव प्रभाकर हजारे जि. प. जवळा द्वितीय- शिवराज भरत काळे जि प कुसडगाव तृतीय- प्रीती पोपट कोकरे जि प बटेवाडी उत्तेजनार्थ- अर्शद अजीम शेख प्रदिपकुमार बांगर विद्यालय मोहा
पहिली ते पाचवी गणित प्रथम -तन्वी संजय ढवळे जि. प. रत्नापुर द्वितीय- सार्थक सतिश गायकवाड- जि. प. पिंपळगाव आळवा तृतीय – जिशान जमीर पठाण जि प. पाटोदा उत्तेजनार्थ – ऋग्वेद पाराजी टेमकर – नवीन मराठी शाळा जामखेड
सहावी ते आठवी विज्ञान प्रथम- श्रेयश मोरेश्वर रेळेकर नवीन मराठी शाळा जामखेड द्वितीय- श्रेया श्रीकांत ढवळे जि प शाळा हळगाव तृतीय- समृद्धी बाळासाहेब पेचे कालीका पोदार जामखेड उत्तेजनार्थ – स्वप्नील सुभाष बोराटे ल. ना. होशिंग जामखेड
सहावी ते आठवी गणित प्रथम आर्या बाळासाहेब औटी कालीका पोदार जामखेड द्वितीय – संस्कार धनराज उबाळे अणखेरी विद्यालय फक्राबाद तृतीय – आमान रशिद शेख जि प. पिंपळगाव उंडा उत्तेजनार्थ- श्रेया सुरेश रोडे छत्रपती शिवाजी विद्यालय जवळा
नववी ते बारावी विज्ञान प्रथम – कुणाल भाऊसाहेब पंडित, विंचरणा विद्यालय पिंपरखेड – कचरा व्यवस्थापन व वीज निर्मिती द्वितीय- देवांश अमोल सांगळे, ल. ना. होशिंग विद्यालय जामखेड – होम फार्मा तृतीय- आर्यन अनिल अनारसे, नंदादेवी विद्यालय नान्नजज्ञ- मुक्त गाय गोठा व आपत्ती व्यवस्थापन उत्तेजनार्थ- सान्वी प्रदिप ढगे, खर्डा इंग्लिश स्कूल- पर्यावरण संरक्षण व उर्जा स्त्रोत
नववी ते बारावी गणित प्रथम क्रमांक- लक्ष्मी लहू वराट – श्री साकेश्वर विद्यालय साकत, पायथागोरस चे प्रमेय
द्वितीय – सौरभ अमोल निर्मळ, हनुमान विद्यालय दिघोळ- आमच्या साठी गणित
तृतीय – प्रणिती भीवा शिंदे, अरणेश्वर विद्यालय अरणगाव – कोणाचे प्रकार
उत्तेजनार्थ – लक्ष्मी विनोद वायकर बालसेवा विद्या मंदिर वाकी- गणितीय आकार
प्राथमिक शिक्षक गट प्रथम- कदम सचिन सुभाष, जि प हाळगाव भुमीतीचे मुलभूत संबोध द्वितीय- औटी बाळासाहेब अंबादास, जि प रत्नापुर हसत खेळत शिक्षण तृतीय- जायभाय वृशाली भागवत, नविन मराठी शाळा जामखेड, प्रदुषण
माध्यमिक शिक्षक गट प्रथम क्रमांक- बोराटे सुभाष नामदेव, न्यू इंग्लिश स्कूल राजुरी, नैसर्गिक शेती द्वितीय- गायकवाड शिवाजी सुदाम, केदारेश्वर विद्यालय जातेगाव, गणित पेटी
प्रयोगशाळा परिचर प्रथम क्रमांक- पाटील एम. बी. साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय पाडळी- लोकसंख्या शिक्षण द्वितीय- झेंडे अशोक बाळासाहेब, प्रदीप कुमार बांगर विद्यालय मोहा, प्रयोग साधणे
अशा प्रकारे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक आले यातील सहावी ते आठवी व नववी ते बारावी गटातील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी जातात तर शिक्षक गटातून प्रथम क्रमांक जातो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आप्पा शिरसाठ यांनी केले यावेळी बोलताना ते म्हणाले की, या प्रदर्शनात 75 शाळा सहभागी झाल्या होत्या 2500 विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहिले शांततेत मोठ्या उत्साहात प्रदर्शन संपन्न झाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नागरगोजे सर तर आभार बाजीराव गर्जे यांनी केले. बक्षीस वितरण प्रस्तावित भाऊसाहेब इथापे यांनी केले.