जामखेड न्युज——-
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडविणारे विद्यालय म्हणून श्री साकेश्वर विद्यालयाची ओळख – शशिकांत देशमुख
वार्षिक पारितोषिक वितरण व दहावी सदिच्छा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
श्री साकेश्वर विद्यालयातील अनेक माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. यामुळे गावाच्या, शाळेच्या नावलौकिकास भर पडली आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडविणारे विद्यालय म्हणून परिसरात विद्यालयाची ओळख निर्माण झाली आहे. असे मत दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव शशिकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या श्री साकेश्वर विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व दहावी सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी सचिव
शशिकांत देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत होशिंग, माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, अभिषेक पाटील, उपसरपंच राजाभाऊ वराट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती कैलास वराट, माजी सरपंच कांतीलाल वराट, महादेव मुरूमकर, माजी प्राचार्य श्रीराम मुरूमकर, विकास वराट, रमेश अडसुळ, राजकुमार थोरवे, अशोक घोलप, महादेव मत्रे, डॉ. राम वराट, बाळासाहेब वराट, महादेव वराट, रामचंद्र वराट गुरूजी, प्रभू वराट गुरूजी, प्रा. भागवत वराट, अँड. शिवप्रसाद पाटील, मुख्याध्यापक दत्ता काळे, भरत लहाने, अजित वराट, बळी लोहार, हनुमंत वराट, त्रिंबक लोळगे, सचिन वराट, मुकुंद वराट, प्रसाद होशिंग, सुलभा लवुळ, अतुल दळवी, आण्णा विटकर, आश्रू सरोदे, अशोक सपकाळ,जिल्हा परिषद साकतचे मुख्याध्यापक वैजनाथ गीते व सर्व स्टाफ, आरोग्य विभागाचा स्टाफ यांच्या सह सर्व विद्यार्थी, अनेक पालक उपस्थित होते.

यावेळी दहावीतील प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच पाचवी ते नववी प्रथम क्रमांक, गणित दिनानिमित्त पोस्टर स्पर्धा क्रमांक, चित्रकला यातील क्रमांकास बक्षिस वितरण विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनेकांनी बक्षिसे जाहीर केली तर रोहित घोडेस्वार यांनी शाळेत पाण्याच्या टाकी साठी पाच हजार रुपये देणगी जाहीर केली तसेच अँड शिवप्रसाद पाटील यांनी शाळेसाठी इंटरनेट सुविधा देण्याचे जाहीर केले.

यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की, चांगले काम केल्यास निश्चित नावलौकिक वाढतो. आत्मिक समाधान मिळते. शिक्षकांना समाजात खुप मोठा सन्मान आहे.

यावेळी सिद्धी मुरूमकर, ऋतुजा वराट, लक्ष्मी वराट, ईश्वरी सरोदे, ईश्वरी सानप, ज्ञानाभाऊ मुरूमकर, कांतीलाल वराट, मुख्याध्यापक दत्ता काळे, कैलास वराट, प्रा. विकास वराट, डॉ. भगवानराव मुरूमकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना माजी प्राचार्य श्रीराम मुरूमकर म्हणाले की, आपली बलस्थाने ओळखा त्यानुसार तयारी करा बलस्थाने शोधण्याचे काम शिक्षक करतात, जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहेत.

यावेळी बोलताना माजी प्राचार्य श्रीकांत होशिंग म्हणाले की, आपले ध्येय निश्चित करा व ध्येयासाठी परिश्रम घ्या, आवडीच्या क्षेत्रात करिअर करा. दहावी हे प्रवेशद्वार आहे दहावी नंतर अनेक क्षेत्रात शाखेत प्रवेश मिळतो. एकाग्र चित्ताने पेपर लिहा. श्री साकेश्वर विद्यालय हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडविणारे विद्यालय म्हणून ओळख निर्माण होत आहे.


