जामखेड न्युज——-
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, पांढऱ्या दुध धंद्यातील तीन काळ्या बोक्याकडून सतरा लाख बत्तीस हजाराचा मुद्देमाल जप्त
राहुरी व जामखेड जामखेड तालुक्यात एकच खळबळ

स्थानिक गुन्हे शाखेकडुन केमीकल पासुन दुध बनवणारे दुध संकलन केंद्रावर छापा, ३ आरोपीकडुन १७,३२,८१६/-रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. यामुळे जिल्ह्यातील जामखेड व राहुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात पांढऱ्या दुधाच्या धंद्यात अनेक काळे बोके असून मोठ्या प्रमाणावर केमिकल युक्त दुध तयार करत लाखो रुपये कमवतात पण यामुळे दुध ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनतो. नागरिकांच्या आरोग्याशी हा खिलवाड आहे त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यामध्ये दुध भेसळ करणारे इसमांची माहिती काढून त्यांचे विरुध्द कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेले आहेत यानुसार मोठी कारवाई करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उप निरीक्षक समीर अभंग पोलीस अंमलदार, हृदय घोडके, संतोष खैरे, दिपक घाटकर,गणेश लबडे, राहुल द्वारके, लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, बिरप्या करमल, श्यामसुंदर जाधव, भिमराज खर्से, राहुल डोके, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सुनिल मालणकर, चालक अरुण मोरे, उमाकांत गावडे यांचे पथक तयार करुन सदर पथकास दुध भेसळ करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याच्या आदेशानुसार वरील कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक १४ / ०२ / २०२६ रोजी जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत दुध भेसळ करणारे इसमांची माहिती काढत असतांना पो. नि. किरणकुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना इसम नामे रामदास नवनाथ उबाळे रा. फक्राबाद ता. जामखेड हा त्याचे दुध संकल केंद्रामध्ये केमीकल पासुन दुध तयार करुन ते संकलन झालेल्या दुधामध्ये मिक्स करत असल्याची माहिती प्राप्त झाली.



