भाजपा नेते संजय (काका) काशिद यांच्या वतीने विविध क्रीडाप्रकारातील विजयी खेळाडू व प्रशिक्षकांचा जाहीर सत्कार
सामाजिक कामात अग्रेसर असणारे भाजपा नेते संजय काका काशिद यांनी विविध क्रीडाप्रकारात नावलौकिक मिळवून जामखेड चा नावलौकिक वाढवलेला आहे असे खेळाडू व मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दिनांक ५-१-२०२५ ते दिनांक ८-१-२०२५ दरम्यान एल एन सी टी विश्वविद्यालय द्वारा आयोजित, भोपाळ येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत जामखेडच्या श्री शंभुसूर्य मल्लखांब प्रशिक्षण संस्थेची विद्यार्थिनी कु. स्नेहल भोसले हिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला रौप्य व कांस्यपदक मिळवून दिल्याबद्दल तसेच याच स्पर्धेत सहभागी झालेला संस्थेचाच खेळाडू चि.शत्रुघ्न जरे तसेच ७ ते १० जानेवारी २०२५ दरम्यान नांदेड येथे झालेल्या ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन
आयोजित २२ वी राज्यस्तरीय सिनियर ( महिला व पुरुष) वुशू अजिंक्यपद स्पर्धेमध्ये विजेत्या ठरलेल्या जामखेड येथील आयडीयल स्पोर्ट ॲकॅडमीचे खेळाडू चि.सुरेश राऊत, मोहिनी शिरगिरे, कोमल डोकडे या जामखेड येथील खेळाडूंनी अनुक्रमे मल्लखांब व वुशू या क्रीडाप्रकारात राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय पातळीवर मोठा विजय संपादित करून जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याने विजयी खेळाडू तसेच त्यांचे प्रशिक्षक श्री बबलु वस्ताद टेकाळे, अमोल निमोणकर, श्री.लक्ष्मण उदमले, श्री.शाम पंडित यांना या प्रसंगी सन्मानित करण्यात आले.
प्रसंगी भा.ज.पा नेते संजय (काका) काशिद, पेंटर छगन क्षिरसागर, सभापती प्रा.राम शिंदे साहेबांचे स्वीय सहाय्यक डॉ. अल्ताफ शेख,भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष संतोष गव्हाळे,डॉ.विठ्ठल राळेभात, प्रवीण होळकर, जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.किशोर काळे, श्री.केशव कोल्हे सर, अशोक जावळे सर, नाथा शिरगिरे,विलास विटकर, निलेश गौंड, रवि क्षिरसागर तसेच सर्व कार्यकर्ते व खेळाडू उपस्थित होते.