जामखेड न्युज——
आवडीच्या क्षेत्रात नावलौकिक मिळवा -कैलास वराट
श्री साकेश्वर विद्यालयात वार्षिक पारितोषिक व दहावी सदिच्छा निरोप समारंभ संपन्न

विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात जीव ओतून काम करा विद्यार्थी दशेत कष्ट घ्या तरच यश मिळणार आहे. अल्पशा यशाने हुरळून जाऊ नका, अंगी जिद्द चिकाटी ठेवा यशाला कोणताही शॉर्ट कट नसतो. असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांनी व्यक्त केले.

श्री साकेश्वर विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व दहावीचा सदिच्छा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी अध्यक्षस्थानी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर होते तर
प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी मारूती सांळुके,
जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, सरपंच हनुमंत पाटील, ज्ञानदेव मुरूमकर, हनुमंत वराट, रामचंद्र वराट गुरूजी, प्रभु वराट गुरूजी, श्रीकृष्ण वराट सहाय्यक विक्रीकर अधिकारी, मच्छिंद्र कडभने, अशोक वाघमारे, बळी लोहार, कन्हैया लोहार, अमृत लोहार, आश्रू सरोदे, मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, अर्जुन रासकर, महादेव मत्रे, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सचिन वराट, सुलभा लवुळ, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर यांच्या सह अनेक मान्यवर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना कैलास वराट म्हणाले की, नेहमी चांगल्यांची संगत ठेवा, जीवनात काय बनायचे ते ठरवा त्यादृष्टीने प्रयत्न करा शासनामार्फत मुलींच्या शिक्षणासाठी अनेक योजना राबविल्या जातात याचा फायदा घ्या असे आवाहनही केले.

यावेळी संध्या घोडेस्वार, सई जावळे, शिवरत्न वराट, अश्विनी मुरूमकर, समृद्धी वराट या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली तर ज्ञानदेव मुरूमकर, श्रीकृष्ण वराट, कैलास वराट, संजय वराट यांनी आपले मनोगते व्यक्त करत मुलांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

कवी मारूती सांळुके यांनी आपल्या बहारदार कवितांनी विद्यार्थ्यांना खळखळून हसवले तसेच काही कवितांनी गंभीर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन रासकर यांनी, प्रस्तावित मुख्याध्यापक दत्ता काळे यांनी तर आभार अशोक घोलप यांनी मानले.






