जामखेड न्युज——
विद्यालयाने दिलेली ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर उपयोगी पडते – संजय वराट
श्री साकेश्वर विद्यालयात वार्षिक पारितोषिक व दहावी सदिच्छा निरोप समारंभ संपन्न
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत ज्ञानाच्या धड्याबरोबरच आदर्श नागरिक बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांचा विकास करत असते. विद्यालयात मिळणारी ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर उपयोगी पडते असे मत जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती व जिजामाता हायस्कूल देवदैठणचे मुख्याध्यापक संजय वराट यांनी व्यक्त केले.
श्री साकेश्वर विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व दहावीचा सदिच्छा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी अध्यक्षस्थानी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर होते तर
प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी मारूती सांळुके, कैलास वराट सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड, सरपंच हनुमंत पाटील, ज्ञानदेव मुरूमकर, हनुमंत वराट, रामचंद्र वराट गुरूजी, प्रभु वराट गुरूजी, श्रीकृष्ण वराट सहाय्यक विक्रीकर अधिकारी, मच्छिंद्र कडभने, अशोक वाघमारे, बळी लोहार, कन्हैया लोहार, अमृत लोहार, आश्रू सरोदे, मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, अर्जुन रासकर, महादेव मत्रे, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सचिन वराट, सुलभा लवुळ, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर यांच्या सह अनेक मान्यवर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय वराट म्हणाले की, शिकण्यात सातत्य ठेवा, अंगी जिद्द चिकाटी मेहनत करण्याची तयारी असेल तर यश हमखास मिळतेच. शाळा या गावाचे वैभव असते. आपण यशस्वी होऊन मोठे होऊन शाळेचा नावलौकिक वाढवावा असेही सांगितले.
यावेळी संध्या घोडेस्वार, सई जावळे, शिवरत्न वराट, अश्विनी मुरूमकर, समृद्धी वराट या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली तर ज्ञानदेव मुरूमकर, श्रीकृष्ण वराट, कैलास वराट, संजय वराट यांनी आपले मनोगते व्यक्त करत मुलांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
कवी मारूती सांळुके यांनी आपल्या बहारदार कवितांनी विद्यार्थ्यांना खळखळून हसवले तसेच काही कवितांनी गंभीर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन रासकर यांनी, प्रस्तावित मुख्याध्यापक दत्ता काळे यांनी तर आभार अशोक घोलप यांनी मानले.