ल. ना. होशिंग विद्यालयात स्वातंत्र्यदिनाचा ७९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा माजी विद्यार्थी प्रशांत मनोहर कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण; एनसीसी संचलन, देशभक्तीपर गीतांसह विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन
ल. ना. होशिंग विद्यालयात स्वातंत्र्यदिनाचा ७९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
माजी विद्यार्थी प्रशांत मनोहर कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण; एनसीसी संचलन, देशभक्तीपर गीतांसह विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड येथे भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा ७९ वा वर्धापन दिन शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे विद्यालयाचे माजी विद्यार्थी व पुणे येथील युवा उद्योजक, उच्च विभूषित मा. प्रशांत मनोहर कुलकर्णी यांच्या हस्ते सकाळी ८.०५ वाजता झालेला ध्वजारोहण समारंभ. यावेळी त्यांच्या समवेत पत्नी, भाऊ व मुलगी उपस्थित होते.
आपण ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्याच विद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्याचा मान मिळाल्याबद्दल प्रशांत कुलकर्णी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. विद्यालयाशी असलेले ऋण व्यक्त करताना प्रशांत कुलकर्णी म्हणाले, “याच शाळेत मी शिकलो आणि आज याच शाळेचे ध्वजारोहण करण्याचे भाग्य मला मिळाले, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपण ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेसाठी काहीतरी देणे लागतो. विद्यालयासाठी दोन हजार लिटर पेंट देणे हे माझे कर्तव्य समजून मी कलर दिला आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजविण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ध्वजारोहणानंतर विद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध कलागुणांचे सादरीकरण केले.
यावेळी प्राचार्य बी. ए. पारखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की संस्था अमृत महोत्सव साजरा करत आहे. विद्यालयाने अ प्लस श्रेणी प्राप्त केले आहे. पुढे बोलताना सांगितले की, केवळ घोषणाबाजी न करता स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या विचारांची व त्यागाची आठवण ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व समजून घेऊन देशाच्या प्रगतीसाठी जबाबदार नागरिक म्हणून योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास डॉ कल्याण काशिद, शिवाजी कासार, अझहर काझी, मुक्तार सय्यद, विद्यालयाचे माजी प्राचार्य अनंता खेत्रे, रमेश अडसूळ, पी. टी. गायकवाड, श्रीधर जगदाळे, रमेश चांदेकर, शहाजी वायकर, अतुल कुलकर्णी, निलेश कुलकर्णी, धनश्री कुलकर्णी, अॅड महारुद्र नागरगोजे यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी ग्रामस्थ व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
“श्रद्धावान लभते ज्ञानम्” या विद्यालयाच्या संस्कारमूल्याला साजेशा वातावरणात देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचा जागर घडविणारा हा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात पार पडला.
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवबापू देशमुख, सचिव अरुणशेठ चिंतामणी, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सहसचिव डॉ. सुनील कटारिया, खजिनदार शरद देशमुख, माजी सचिव शशिकांत देशमुख, दत्तात्रय वडे तसेच माजी खजिनदार राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य बी. ए. पारखे, उपप्राचार्य युवराज भोसले, उपमुख्याध्यापक अनिल देडे, पर्यवेक्षक सुदाम वराट, पांडुरंग वराट, सतीश डुचे, पोपट जगदाळे, मुकुंद राऊत, नरेंद्र डहाळे, राघवेंद्र धनलगडे, विशाल पोले, किशोर कुलकर्णी, रोहित घोडस्वार, उमाकांत कुलकर्णी, बाबासाहेब समुद्र, आदित्य देशमुख, कैलास वराट, विजय क्षीरसागर, हनुमंत वराट, लक्ष्मण सोळंकी, स्वप्निल जाधव, बापू जरे, गणेश नेटके, साई भोसले, लंघे पी. टी., संगिता दराडे, सुप्रिया घायतडक, वंदना अल्हाट, स्वप्नाली घाडगे, पूजा भालेराव, प्रियंका सुपेकर, आर. एस. कारंडे, एस. बी. हंगे, एम. जे. जाधव, एस. डी. जगदाळे, एस. व्ही. भोंडवे, धुमाळ डी. एस. यांच्यासह माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. एनसीसी विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलन, विद्यार्थ्यांचे गुणदर्शन आणि देशभक्तीपर वातावरण यामुळे विद्यालयातील स्वातंत्र्यदिन सोहळा अविस्मरणीय ठरला.