Thursday, February 12, 2026
Home शैक्षणिक बातम्या विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी – डॉ.भगवानराव मुरूमकर श्री साकेश्वर विद्यालयात...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी – डॉ.भगवानराव मुरूमकर श्री साकेश्वर विद्यालयात वार्षिक पारितोषिक व दहावी सदिच्छा निरोप समारंभ संपन्न

0
540

जामखेड न्युज——

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी – डॉ.भगवानराव मुरूमकर

श्री साकेश्वर विद्यालयात वार्षिक पारितोषिक व दहावी सदिच्छा निरोप समारंभ संपन्न

 

 

आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आई वडील खुप खास्ता खात असतात खुप कष्ट सोसतात या कष्टाची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवून चांगला अभ्यास करावा जीवनात कितीही मोठे झालात तरी आई- वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी असे मत पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.भगवानराव मुरूमकर यांनी व्यक्त केले.

श्री साकेश्वर विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व दहावीचा सदिच्छा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी मारूती सांळुके, संजय वराट पंचायत समिती माजी सभापती, कैलास वराट सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड, सरपंच हनुमंत पाटील, ज्ञानदेव मुरूमकर, हनुमंत वराट, रामचंद्र वराट गुरूजी, प्रभु वराट गुरूजी, श्रीकृष्ण वराट सहाय्यक विक्रीकर अधिकारी, मच्छिंद्र कडभने, अशोक वाघमारे, बळी लोहार, कन्हैया लोहार, अमृत लोहार, आश्रू सरोदे, मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, अर्जुन रासकर, महादेव मत्रे, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सचिन वराट, सुलभा लवुळ, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर यांच्या सह अनेक मान्यवर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.


यावेळी बोलताना डॉ. मुरूमकर म्हणाले की, प्रत्येकात कोणता ना कोणता गुण असतोच याच सुप्त गुणांचा शाळा महाविद्यालयात विकास होत असतो. साकत हि शिक्षकांची खाण आहे. तसेच शाळेतील पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेऊन शाळेसाठी स्व खर्चातून कूपनलिका देण्याचे आश्वासन दिले. तसेच शाळेपुढील रस्त्याचा प्रश्न आमदार प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून लवकच मार्गी लागेल असेही सांगितले.

यावेळी संध्या घोडेस्वार, सई जावळे, शिवरत्न वराट, अश्विनी मुरूमकर, समृद्धी वराट या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली तर ज्ञानदेव मुरूमकर, श्रीकृष्ण वराट, कैलास वराट, संजय वराट यांनी आपले मनोगते व्यक्त करत मुलांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

कवी मारूती सांळुके यांनी आपल्या बहारदार कवितांनी विद्यार्थ्यांना खळखळून हसवले तसेच काही कवितांनी गंभीर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन रासकर यांनी, प्रस्तावित मुख्याध्यापक दत्ता काळे यांनी तर आभार अशोक घोलप यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!