जामखेड शहरातील निकृष्ट व बोगस कामाला ठेकेदार जबाबदार, ठेकेदाराला सत्ताधाऱ्यांचे अभय – शहाजी राळेभात
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे
जामखेड शहरात राष्ट्रीय महामार्ग तसेच अंडरग्राउंड गटार योजनेचे काम सुरू आहे पण कामे निकृष्ट दर्जाचे व बोगस होत आहेत याला जबाबदार ठेकेदार आहेत. आणि त्यांना सत्ताधारी पक्षाचे अभय आहे. यामुळेच तीनच दिवसांत राष्ट्रीय महामार्ग कामाला तडे गेले आहेत. तसेच गटार योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. आम्ही कामाचा दर्जात सुधारणा झाली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शहाजी राळेभात यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील सर्व ठिकाणचे अतिक्रमणे हटविण्यात आले आहेत फक्त जामखेड मधील अतिक्रमणे का निघत नाहीत. सध्या कामे निकृष्ट दर्जाचे सुरू आहेत याला सत्ताधारीच जबाबदार आहेत.
जामखेड नगरपरिषद हद्दीतील मलनिःसारण प्रकल्प (टप्पा-१) अंतर्गत सुरू असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे, नियमबाह्य आणि संथ गतीने सुरू असून, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही यामुळे उपोषणाचा मार्ग अवलंबिला होता.
नगरपरिषद हद्दीत सुरू असलेल्या अंडरग्राउंड गटर योजनेच्या कामात निकृष्ट व बोगस दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका उपस्थित झाल्याने संबंधित प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. तरीही सुधारणा न झाल्याने लोकशाही मार्गाने उपोषण सुरू करण्यात आले. सुमारे दहा तास चाललेल्या उपोषणानंतर संबंधित ठेकेदाराचे साईट इंजिनिअर व जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे त्यांनी पुढील १५ दिवसांत झालेल्या कामांची सखोल तपासणी करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिलेत्यावेळीराष्ट्रवादी काँग्रेसचे(शरद पवार गट)उपोषण स्थगित करण्यात आले.
तपासणीत निकृष्ट साहित्य आढळल्यास ते तत्काळ हटवून दर्जेदार साहित्य वापरण्यात येईल. तसेच सुमारे ८० कोटींच्या मलनिस्सारण भूमिगत गटर योजनेची कामे नियमानुसार व दर्जेदार पद्धतीने पूर्ण केली जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. झालेल्या कामांची नागरिकांसमोर प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते शहाजी राळेभात, जेष्ठ नेते वैजिनाथ पोले, राजेंद्र गोरे, प्रशांत राळेभात, संभाजी राळेभात, इस्माईल सय्यद,बिभिषण (मामा) धनवडे,वसीम सय्यद,संदीप राळेभात, कुंडल राळेभात,इराफ कुरेशी यांच्यासह मंगेश आजबे, सागर सदाफुले, रमेश आजबे, अवधूत पवार, निखिल घायतडक, संजय डोके,वसीम शेख, नासिर चाचू सय्यद,अमोल गिरमे, अशोक घुमरे,जुबेर शेख, बिलाल शेख, आसिफ शेख, बजरंग डुचे, प्रविण माकुडे, अझहर खान,गणेश हगवणे,अनिल अडाले, सचिन शिंदे, सागर भोसले,अनिल अडाले,दिपक घायतडक, गणेश आजबे,बाळासाहेब खैरे, सलीम शेख,पै.सैफ शेख, दत्तात्रय डिसले, इमरान तांबोळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते व स्थानिक नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.