प्रगतीसाठी विज्ञानाची कास धरा – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे जामखेड तालुका गणित विज्ञान प्रदर्शनाचा उत्साहात समारोप,193 उपकरणे सहभागी

0
882

जामखेड न्युज——

प्रगतीसाठी विज्ञानाची कास धरा – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे

जामखेड तालुका गणित विज्ञान प्रदर्शनाचा उत्साहात समारोप,193 उपकरणे सहभागी

 

तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनात बाल वैज्ञानिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला परीक्षकांनी पारदर्शकपणाने परीक्षण केलेले आहे. यामध्ये सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो. अपयशाने विद्यार्थ्यांनी खचुन जाऊ नये. पुढील वर्षी आणखीन चांगली तयारी विद्यार्थ्यांनी करावी. पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन प्रेरणा दिली पाहिजे विज्ञान- तंत्रज्ञानामुळे जगाची प्रगती झाली आहे. त्यामुळे अंधश्रद्धा न बाळगता विज्ञानाची कास धरली पाहिजे असे मत गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी व्यक्त केले.

 

रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय जामखेड मध्ये शिक्षण विभाग व पंचायत समिती जामखेड तालुका गणित विज्ञान अध्यापक संघटना व श्री नागेश विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 48 वी जामखेड तालुका विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शना चे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात तालुक्यातील प्राथमिक विद्यार्थी 76 माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थी 117 असे एकूण 193 उपकरणे सहभागी झाले.


कार्यक्रमाची सुरुवात गणित दिना निमित्त कर्मवीर भाऊराव पाटील व थोर शास्त्रज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून
विस्तार अधिकारी कैलास खैरे, कन्या विद्यालय कमिटी सदस्य सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले , शिवाजी ढाळे, मुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, गोकुळ गायकवाड ,गाडे महाराज ,निकम महाराज मुख्याध्यापिका चौधरी केडी ,मुख्याध्यापिका मीना राळेभात, मिठूलाल नवलाखा, केशव गायकवाड, मुकुंदराज सातपुते, भाऊसाहेब इथापे, भरत लहाने, शिवाजी गायकवाड, बाजीराव गर्जे, रघुनाथ मोहळकर, साळुंखे बी एस, संतोष ससाणे यांच्या सह अनेक शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रदर्शनामध्ये गणित विज्ञान व पर्यावरण अनुक्रमे क्रमांक पुढील प्रमाणे

पहिली ते पाचवी विज्ञान प्रथम तीन –
यश गणेश जमदाडे, विजयकुमार नंदकुमार मोहोळकर ,कन्हैया राजेंद्र काटकर

सहावी ते आठवी विज्ञान प्रथम तीन राहुल तात्याराम लबडे, प्रसाद विष्णू मोहोळकर, भूषण अशोक यादव,उत्तेजनार्थ- समर्थ संतोष मोहोळकर

नववी ते बारावी विज्ञान प्रथम तीन- सुयश नामदेव साळवे ,श्रेयश मुठुलाल नवलाखा, कु.अफिया असिफ तांबोळी

पहिली ते पाचवी गणित प्रथम तीन ऋग्वेद पिराजी टेमकर ,ईश्वरी आबासाहेब पवार, वेदिका अजित कदम, किमया गणेश चव्हाण

सहावी ते आठवी गणित प्रथम तीन – सार्थक सुशेन गव्हाणे ,अथर्व अजिनाथ शिरसाठ, कु. अमृता कल्याण चौधरी, प्रशांत भाऊसाहेब ढवळे

नववी ते बारावी गणित प्रथम तीन- कु.समृद्धी शंकर वराट, कु. सृष्टी दादासाहेब कोल्हे,कु ओम राजेंद्र ढवळे, कु उत्कर्षा हनुमंत निकम

प्राथमिक शिक्षक गट प्रथम तीन- जरांडे बाळू गंगाराम ,आवटी बाळासाहेब अंबादास, मोहळकर रघुनाथ भानुदास

माध्यमिक गट शिक्षक प्रथम तीन- आंधळे बाबासाहेब महादेव, बाबर गोपाल अंकुशराव, मत्रे महादेव नरसिंग.

वरील विद्यार्थी व शिक्षकांचा प्रमाणपत्र ट्रॉफी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

आदर्श शिक्षक म्हणून अमोल भोंडवे रघुनाथ मोहळकर, श्रीम. शारदा बोळे, प्रदीप ससाने यांचा सन्मान करण्यात आला.

श्री नागेश विद्यालय उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल प्राचार्य मडके बी के यांचा संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
तसेच श्री नागेश विद्यालयाचे एनसीसी कॅडेट व एनसीसी ऑफिसर भोसले यांनी उत्कृष्ट सहकार्य केल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

गोकुळ गायकवाड यांचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविक भाऊसाहेब इतापे सर यांनी केले.
प्राचार्य मडके बीके यांनी मनोगतात विज्ञान गणित प्रदर्शनामध्ये बाल शास्त्रज्ञांनी अतिशय उत्कृष्ट उपकरणे तयार केले त्यांचे विद्यालयांचे वतीने अभिनंदन केले. सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी हे उपक्रम अतिशय महत्त्वाचे आहे.

कन्या विद्यालय स्कूल कमिटी सदस्य सुरेश भोसले यांनी मनोगत मध्ये हे जग विज्ञानामुळे पुढे चाललेले आहेत विज्ञानामुळे प्रत्येक क्षेत्रात प्रगती झाली आहे. बालपणापासूनच अभ्यासाचे संस्कार व गोडी निर्माण झाल्यास विद्यार्थी यशस्वी होतो. आजचे विद्यार्थी उद्याचे देशाचे वैज्ञानिक असू शकतात असे मनोगत व्यक्त करून
प्रदर्शनामध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

पुढील वर्षी प्रदर्शन घेण्याचा मान मोहा प्रदीप कुमार बांगर विद्यालयास नारळ देऊन सन्मानित करण्यात आले. गणित विज्ञान प्रदर्शन बक्षीस वितरण बाजीराव गर्जे, सूत्रसंचालन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संभाजी इंगळे ,स्वाती अभंग आभार प्रदर्शन संतोष ससाणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here