आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्मार्ट इंडिया हँकेथाँन महाअंतिम फेरीत हर्ष डुचे यांच्या टीमला प्रथम क्रमांक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले सर्वच सहभागी टीमला संबोधित

0
609

जामखेड न्युज——

आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्मार्ट इंडिया हँकेथाँन महाअंतिम फेरीत हर्ष डुचे यांच्या टीमला प्रथम क्रमांक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले सर्वच सहभागी टीमला संबोधित

 

स्मार्ट इंडिया हँकेथाँन महाअंतिम सोहळा मंगळवारी पार पडला यात देशभरातील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी सहभागी झाले होते. जेएसपीएम इंपिरियल काॅलेज आँफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पुणे येथील टीम लिडर हर्ष डुचे यांच्या टीमला प्रथम क्रमांकाचे एक लाख रुपयांचे बक्षीस मिळाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच सहभागी टीमचे अभिनंदन करत सर्व स्पर्धक टीमला संबोधित केले.

जेएसपीएम इंपिरियल काॅलेज आँफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पुणे या काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी हर्ष डुचे यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट इंडिया हँकेथाँन महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकावला यात सहभागी विद्यार्थी प्रेम बोराटे,क्षितीजा देशमुख, मयांत भटगरे, आदित्य तोटे, प्रणव सोनवणे हे होते या सर्वांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एकविसाव्या शतकात जय जवान जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान या मंत्रानुसार मार्गक्रमण करावयाचे आहे. आपला प्रयत्न पुढील हजार वर्षांच्या भारताचा पाया मजबूत करणार आहे. देशातील युवा शक्ती स्मार्ट इंडिया हँकेथाँन च्या माध्यमातून विकसित भारतासाठी उपायांचे अमृत काढत आहे.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, एआय वेगाने प्रगती करत आहे. नागरिकांनी नवीन तंत्रज्ञानाबाबत सतर्क रहावयास हवे.

 

हर्ष डुचे यांच्या टीमने पाण्याचे महत्त्व व वापर यावर सादरीकरण

भारत शाश्वत विकासाकडे वाटचाल करत असताना, एखाद्या व्यक्तीने किंवा समूहाने वापरलेल्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात किंवा पुरवठ्यामध्ये वापरल्या जाणार्‍या ताज्या पाण्याच्या प्रमाणाचे मोजमाप म्हणजे वॉटर फूटप्रिंट. आमचे प्रोजेक्ट वॉटर फूटप्रिंट कॅल्क्युलेटर हे केवळ डिजिटल सोल्यूशन नाही तर जल-जागरूक समाज निर्माण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेशी संरेखित केलेला दृष्टीकोन आहे.

प्रॉब्लेम स्टेटमेंटच्या पैलूची पूर्तता करण्यासाठी आम्ही कॉम्प्युटर व्हिजन आणि एमएल वापरत आहोत ज्यामध्ये असे म्हटले आहे की वापरकर्त्याला ऑब्जेक्ट स्कॅन करण्यासारख्या लहान इनपुटसह वॉटर फूटप्रिंट डेटा प्रदान केला पाहिजे. आमच्या सोल्यूशन्समध्ये इंटरएक्टिव्ह वेबपेज आणि अँड्रॉइड अँप्लिकेशन देखील समाविष्ट आहे. वेबसाइट आणि अनुप्रयोग दोन्ही परस्परसंवादी आहेत आणि बहुभाषिक समर्थनाद्वारे संपूर्ण भारत प्रवेशयोग्यता प्रदान करतात.

 

जल-शक्ती मंत्रालयाकडून वॉटर फूटप्रिंटशी संबंधित ताज्या बातम्या आणि रिअलटाइम ट्विटर फीड असलेले न्यूज पेज उपलब्ध करून दिले आहे. आम्ही वॉटर फूटप्रिंट डेटा आणि संसाधनांसह एक LLM समर्थित इनहाऊस चॅटबॉट देखील विकसित केला आहे. हे प्रॉब्लेम स्टेटमेंट जलशक्ती मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे आणि मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या लोकांकडून त्याचे मूल्यमापन करण्यात आले आहे.

जेएसपीएम इंपिरियल काॅलेज आँफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पुणे येथील हर्ष डुचे यांच्या नेतृत्वाखाली
प्रेम बोराटे,क्षितीजा देशमुख, मयांत भटगरे, आदित्य तोटे, प्रणव सोनवणे यांनी इंटरनॅशनल लेव्हल वरती प्रथम क्रमांक पटकावला आहे. सुमारे एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांचा प्राॅब्लेम स्टेटमेंट नंबर 1287 होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here