जामखेड महाविद्यालयात आयएसओ मूल्यांकनासाठी एकदिवसीय कार्यशाळा व सेमिनार उत्साहात संपन्न

0
325

जामखेड न्युज——

जामखेड महाविद्यालयात आयएसओ मूल्यांकनासाठी एकदिवसीय कार्यशाळा व सेमिनार उत्साहात संपन्न

महाविद्यालयाला उत्कृष्ट मानांकन आणि मूल्यांकन मिळण्यासाठी प्रत्येक घटकाने आपल्या कामांमध्ये सातत्य, चिकाटी आणि सकारात्मकता ठेवली तर आपण निश्चितपणे महाविद्यालयाला उत्कृष्टते कडे नेऊ शकतो आणि जामखेड महाविद्यालय त्या योग्यते कडे वाटचाल करण्यास पात्र आहे . असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते व आय. एस .ओ टीम लीडर मा. श्री अनिल येवले यांनी व्यक्त केले.

जामखेड महाविद्यालयात संपन्न झालेल्या ‘भविष्यातील आवाहने वाटचाल आणि संधी’ या विषयावर संपन्न झालेल्या एकदिवसीय कार्यशाळे मध्ये बोलत होते . कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष अरुणशेठ चिंतामणी यांच्या हस्ते झाले तर सदर कार्यक्रमास संस्थेचे संचालक अशोकशेठ शिंगवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डोंगरे एम. एल म्हणाले की, राष्ट्रीय मानांकन आणि मूल्यांकन समितीकडुन होणाऱ्या मूल्यांकनाचा भाग म्हणून महाविद्यालयास आय .एस.ओ करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून आजची कार्यशाळा घेण्यात आली.विद्यार्थी आणि शिक्षकांचा प्रचंड उत्साह आणि प्रतिसाद मिळाला.


अशोकशेठ शिंगवी म्हणाले कि, महाविद्यालयातील शिक्षकांनी मनापासून निष्ठेने व ध्येयाने काम केले तर महाविद्यालय अपेक्षित यश मिळू शकेल याची आम्हाला खात्री आहे.

याप्रसंगी सेंचुरी कॉम्प्युटरचे संचालक जगताप व काळदाते यांनी महाविद्यालयास एम.के.सी.एल यांच्या वतीने उत्कृष्ट अशी संविधानाची प्रतिमा भेट दिली.

या कार्यक्रमास दि, पीपल्स् एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवबापू देशमुख, संस्थेचे सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे, संचालक सैफुल्ला खान तसेच इतर मान्यवर संचालक यांनी शुभेच्छा दिल्या.


याप्रसंगी मिरजगाव महाविद्यालयाचे र्प्राचार्य , डॉ. चंद्रकांत मंडलिक व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व अनेक विद्यार्थी उपस्थित होते. तसेच कला विभागाचे प्रमुख प्रा.फलके ए.बी., अंतर्गत गुणवत्ता कक्ष हमीचे समन्वयक प्रा. संजय गाडेकर, विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रा. फलके ए.बी यांनी मानले . सूत्रसंचालन प्रा. नितीन तरटे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here