जामखेड न्युज——
गोकुळ गायकवाड यांचा संतपीठ श्री क्षेत्र पैठणच्या वतीने प्रमाणपत्र प्रदान
संत तुकाराम गाथा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
जामखेड येथील प्राथमिक शिक्षक तसेच बौध्दाचार्य
साहित्यिक यांनी पैठण संतपीठाचा संत तुकाराम गाथा अभ्यासक्रमप्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्याबद्दल आज १६ डिसेंबर रोजी संतपीठ श्री क्षेत्र पैठण येथे जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र करण्यात आले याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून सन्मान करण्यात येत आहे.
गोकुळ गायकवाड हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रत्नापूर ता. जामखेडचे आदर्श शिक्षक, बौध्दाचार्य, साहित्यिक आहेत. त्यांनी पैठण संतपीठाचा संत तुकाराम गाथा अभ्यासक्रमात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
याबद्दल आज शनिवार दि. १६/१२/२०२३ रोजी संतपीठ श्री क्षेत्र पैठण येथे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ प्रमोद येवले, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ समन्वयक प्रा. डॉ. वक्ते यांचे शुभहस्ते हस्तेप्रमाणात प्रदान करण्यात आले.
गोकुळ गायकवाड हे विद्यार्थी प्रिय,आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानित, बौद्ध धम्माचे गाढेअभ्यास आहेत.
“धम्मपदा बोलती दोहे आणि गाथा” आणि “माझा गाव माझी माणसं” या दोन्ही साहित्यकृतीस राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार मिळाले आहेत. लवकरच त्यांचा ताटातूट हा कथा संग्रह प्रकाशित होत आहे.
या यशाबद्दल जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, शिक्षक बॅंक संचालक संतोष राऊत, विस्तार अधिकारी सुनील जाधव, केंद्र प्रमुख विक्रम अभिनंदन केले आहे.