आंतरमहाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धेत जामखेड महाविद्यालय अव्वल 

0
620

जामखेड न्युज——

आंतरमहाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धेत जामखेड महाविद्यालय अव्वल 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धा जामखेड महाविद्यालयात जल्लोषात पार पडल्या.
यात जामखेड महाविद्यालय जामखेड अव्वल स्थानी राहिले. 
 या स्पर्धेमध्ये जामखेड महाविद्यालय संघ अंतिम विजेता ठरला तर सी.डी. जैन महाविद्यालय श्रीरामपूर उपविजेता संघ ठरला. जामखेड महाविद्यालयाच्या प्रांगणात बॉल बॅडमिंटनच्या या स्पर्धा उत्साह पूर्ण वातावरणात पार पडल्या. 
अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात जामखेड महाविद्यालयाच्या खेळाडूंनी श्रीरामपूरच्या सी. डी. जैन महाविद्यालयाच्या संघावर मात करून अंतिम सामना विजय संपादन केला.  
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अहमदनगर जिल्हा क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या अंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धा भरवण्यात आल्या.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी दि, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव बापू देशमुख होते. सदर स्पर्धेचे उद्घाटन अजय साळवे मुख्याधिकारी जामखेड नगरपरिषद यांच्या हस्ते झाले.
 याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, विद्यार्थी अवस्थेत तर सांघिक भावना जोपासली गेली तर निश्चितपणे जीवनामध्ये आपण यश मिळवू शकतो. 
याप्रसंगी संस्थेचे सचिव माननीय श्री शशिकांत  देशमुख यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर  मार्गदर्शन केले.   प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक अध्यक्ष अहमदनगर जिल्हा क्रीडा समिती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष अरुणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार राजेश मोरे तसेच अहमदनगर जिल्हा क्रीडा विभागाचे सचिव डॉ. राजेंद्र देवकाते उपस्थित होते.
 कार्यक्रमाच्या सुरुवातीला जामखेड महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. एम एल डोंगरे यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच सर्व खेळाडूंना यश मिळावे अशी सदिच्छा व्यक्त केली. या स्पर्धेसाठी तीन मैदाने तयार करण्यात आली  होती. राष्ट्रीय खेळाडू धीरज पाटील प्रल्हाद साळुंखे, पंकज पोकळे समद शेख फैयाज शेख नितीन यादव वरील सर्व राष्ट्रीय खेळाडूं यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
         स्पर्धेच्या आयोजनासाठी  शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अण्णा मोहिते यांनी विशेष परिश्रम  घेतले. त्यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी यश मिळू शकले. याप्रसंगी प्रा. डॉ. सुनील नरके महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा.फलके ए.बी. यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन प्रा. नितीन तरटे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here