जामखेड न्युज——
व्यायामामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते – शिवाजीराव कराळे
जामखेडमध्ये मत्रे फिटनेस क्लबचे शानदार उद्घाटन संपन्न
नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर (उतारवयातही) निरोगी ठेवण्यास मदत होते. व्ययामाने शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही उत्तम राहते. आजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामाची अत्यंत गरज आहे. नियमित व्यायामामुळे जीवन सुंदरपणे अनुभवता येते. असे मत शिवाजीराव महादेव कराळे संचालक कराळे हेल्थ क्लब अहमदनगर यांनी व्यक्त केले.
अहमदनगर चा व्यायामाचा वारसा जामखेड मध्ये
कराळे हेल्थ क्लबचा उपक्रम सुरू झाला आहे
मत्रे फिटनेस क्लबचे शानदार उद्घाटन समारंभ शनिवार दि. १६ रोजी संपन्न झाला.
आपल्या आरोग्य आणि सुदृढतेसाठी
शिवाजीराव महादेव कराळे संचालक कराळे हेल्थ क्लब व आशाताई शिवाजीराव कराळे नगरसेविका अहमदनगर महानगर पालिका सदस्य जिल्हा नियोजन समिती तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष अजय काशिद,
गौतम उतेकर, नगरसेवक अमित चिंतामणी, बिभीषण धनवडे, मंगेश आजबे, आप्पासाहेब कार्ले,
विकास राळेभात, हभप दिपक महाराज गायकवाड, संतोष गव्हाळे, युवराज मत्रे, श्रीराम मुरूमकर, ज्ञानदेव मुरूमकर, मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, डॉ. भारत दारकुंडे, रमेश अडसूळ, दत्ता राजमाने, दिनेश शिंदे, राजकुमार थोरवे, अर्जुन रासकर, सचिन वराट, अशोक घोलप, अतुल दळवी, डॉ. निखील वारे, कुंडलिक बहिर, आश्रू सरोदे, मकरंद काशिद, नामदेव राळेभात, अविनाश बोधले, लियाकत शेख, अनंता खेत्रे, पंडित गोरे, आलेष जगदाळे, धनंजय कार्ले, प्राचार्य उगले, डॉ. अविनाश पवार, डॉ. प्रशांत गायकवाड, युवराज उगले, प्रा. कविता जगदाळे, अँड. ऋषीकेश डुचे, अभिजीत राळेभात, गणेश उगले, डॉ. देवकर यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित होते.
महादेव नरसिंह मत्रे, समर्थराज महादेव मत्रे
शिल्पा मत्रे हे निमंत्रक म्हणून होते.
यावेळी बोलताना शिवाजीराव कराळे म्हणाले की,
जीवनात शरीर महत्त्वाचे आहे शरीर सुदृढ हवे, नसेल तर जीवनाचा आनंद घेता येत नाही. सध्या मोबाईलचे व्यसन घातक आहे. शरीर सुदृढ असेल तर जिद्द, चिकाटी व ध्येय यामुळे जीवनात हवे ते ध्येय साध्य करता येते.
यावेळी कार्यक्रमाचे आभार मानताना महादेव मत्रे म्हणाले की, जामखेड करांचे आरोग्य सुधारावे म्हणून आम्ही जामखेड येथे खर्डा रोडवर मत्रे हेल्थ क्लब सुरू केले आहे. पैसा कमवणे आमचा उद्देश नाही. यामुळे या क्लबचा फायदा तरूण तरूणींनी घ्यावा असे आवाहन संचालक मत्रे यांनी केले.
यावेळी अमित चिंतामणी यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन संभाजीराव इकडे यांनी केले.