जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील वर्गखोल्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे
जामखेड तालुक्यातील सहा वर्गखोल्या बांधकामासाठी 72 लाखांच्या कामाला प्राथमिक शिक्षण विभागची प्रशासकिय मान्यता मिळाली आहे त्यामुळे आता याठिकाणी प्रशस्त वर्गखोल्या होणार आहेत अशी माहिती गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी दिली.
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी जामखेडचा पदभार स्वीकारल्यापासून तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना विश्वासात घेत कामाला लागले आहेत. काम करणाऱ्या शिक्षकाच्या पाठीवर कौतुकाची थाप तर कामचुकार शिक्षकांवर कारवाई यामुळे शिक्षकही गुणवत्ता सुधारण्यासाठी झपाटून कामाला लागले.
शासकिय लेखा संकेतांक क्रमांक २२०२ जे ८१३ प्राथमिक शाळेच्या इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषदेला अनुदाने या लेखाशिर्षखाली प्राप्ती निधी मधून जामखेड तालुक्यातील सहा गांवातील जिल्हा परिषद शाळेसाठी सहा वर्ग खोल्या बांधकाम करणे या कामास शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अहमदनगर यांनी प्रशासकिय मान्यता दिनांक ९ / ११ / २३च्या आदेशानुसार दिल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे यांनी दिली .
गांव निहाय वर्ग खोल्या व प्राप्त निधी ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
बावी एक वर्गखोली रक्कम रुपये १२ लाख,
खुरदैठण एक वर्गखोली रक्कम रुपये १२ लाख,
सतेवाडी एक वर्गखोली रक्कम रुपये १२लाख,
वाघा एक वर्ग खोली रक्कम रुपये १२ लाख,
सारोळा एक वर्ग खोली रक्कम रुपये १२ लाख,
हापटेवाडी( मोहा) एक वर्ग खोली रक्कम रुपये १२ लाख या प्रमाणे मान्यता मिळाली आहे.
आता या सहा ठिकाणी प्रशस्त वर्गखोल्या होणार आहेत.