सावधान— जामखेडच्या बाजारात बनावट चलनी नोटा!! जामखेड पोलिसांकडून दोघांना अटक

0
2269

जामखेड न्युज——

सावधान—

जामखेडच्या बाजारात बनावट चलनी नोटा!!

जामखेड पोलिसांकडून दोघांना अटक

 

जामखेड भाजी बाजारात बनावट नोटाद्वारे व्यवहार करताना एक संशयित व्यक्ती जामखेड पोलिसांना आढळून आला त्याला अटक करत कसून तपासणी केली असता एक साथीदार छत्रपती संभाजीनगर येथे असल्याचे कळले तेव्हा त्यास तेथून ताब्यात घेतले आणि दोघांकडूनज्ञनोटा बनवण्याच्या सामग्रीसह ३४८४० रुपये किमतीचा मुद्देमाल माल जप्त केला आहे. बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा जामखेड पोलीसांनी पर्दाफाश केल्याबद्दल पोलीसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.


याबाबत जामखेड पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, जामखेड येथील बाजारतळावरील एका ७० वर्षीय भाजी विक्रेत्या महिलेकडून भाजी विकत घेत बनावट नोटा चलनात आणताना एक जण आढळला होता. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हाचा तपास करण्यासाठी छ. संभाजीनगर येथे पाठवलेल्या पथकाने यातील फरारी आणखी एका आरोपीस अटक करत त्यांच्याकडून ३४८४० रुपये किमतीचा मुद्देमाल माल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहेत. याबाबत याबाबत आणखी कोणाला काही माहिती असल्यास पोलीसांना कळविण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे.


याबाबत सविस्तर असे की, जामखेड शहरातील भाजी मंडई येथे दि. ४ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी २:०० वाजताचे च्या सुमारास सुशिला सुर्यभान भुकन या ७० वर्षीय भाजी विक्रेत्या महिला भाजी विकत असतानां त्यांचेकडे यातील आरोपीने २० रुपयांचे चने ( ओले हरबरे ) घेतले. त्याने सुशीला यांना १०० रु. दराच्या दोन नोटा दिल्या. परंतु नोटाचे कागदावरुन सदर भाजी विक्रेत्या महीलेस संशय आल्याने तिने सदर इसमास हाक मारुन परत बोलविले व नोटांबाबत विचारपुस करता तो गडबडल्याने तिचा संशय बळावला. तिने त्या इसमाने दिलेल्या नोटांपैकी एक नोट पाण्यात बुडून पाहीली असात नोटेच्या पाठीमागील रंग उडाल्याचे दिसताच त्या महीलेने आरडाओरडा केला तेथे बाजारातील लोक जमा झाले. त्यांनी सदर आरोपीस पकडुन ठेवुन पोलीसांना बोलावले ताबडतोब जामखेड पोलीस घटनास्थळी दाखल होत पोलीसांनी सदर इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव मोहीत सुनिल कचरे (वय २१ वर्ष रा. घर नंबर ३०, गल्ली नंबर-२, चिखलठाणा, छ. संभाजीनगर असे असल्याचे सांगीतले. त्याच्या कडे १०० रुपये रुपयांच्या ४५ खोटया (बनावट) नोटा मिळुन आल्या. त्याचे डावे खिश्यात २०४० रूपये रोख रक्कम मिळुन आली. त्याचे जवळचे बॅग मध्ये १०० रुपयांच्या ५० खोटया नोटा व रू. १४५० रोख रक्कम मिळुन आली. सदर रक्कम जप्त करुन ताब्यात घेतली.

सदर ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे सखोल विचारपुस करता त्याने सदर नोटा त्याचा मेव्हणा (बहीणीचा नवरा ) अक्षय तारोबा पवार रा. फ्लॅट नंबर ४०४, अक्षरबन सोसायटी झाल्टा फाटा, बीड बायपास, छ. संभाजी नगर याचे मदतीने त्याचे झाल्टा फाटा छ. संभाजी नगर येथील घरी छापल्याचे सांगीतले. तसेच त्याचा मेव्हणा हा मोटारसायकल वर पळुन गेल्याचे सांगीतले. यानुसार आरोपी मोहीत याचेकडुन सर्व माल पंचनामा करुन जप्त करण्यात आला. यावरून पोलीस कॉन्स्टेबल दत्तु बेलेकर यांनी शासनाचे वतीने नोंदविलेले फिर्यादी वरुन जामखेड पोलीस ठाणे गु.र.नं. 499/2023 भा.द.वि. कलम 489 (अ) (ब), (क), (ड) 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत सुरुवातीस एक आरोपीस अटक करण्यात आली होती. मात्र एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यामुळे अहमदनगर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, कर्जत विभागाचेउपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांचे मागदर्शनाखाली व आदेशाने पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी पोलीस पथक तयार करुन ते छ. संभाजी नगर येथे रवाना केले. सदर पोलीस पथकाने फरार आरोपी अक्षय पवार यास छ. संभाजीनगर येथून ताब्यात घेऊन त्याचे कडील रंगीत पिंटर व गायछाप पुडया वैगेरे पंचनामा करुन जप्त करुन ताब्यात घेतले. यातील आरोपीना सदर गुन्ह्यात अटक करण्यात येऊन त्यांचे कडुन सदर गुन्हयातील १ नग प्रिंटर, बनावट नोटा, मोटार सायकल, बॅग, रोख रक्कम वैगरे वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्ह्याचा तपास चालु असुन सदर बाबत काही कोणास माहीती असल्यास त्यांनी जामखेड ठाणे फोन नंबर 02421221033, महेश पाटील पोलीस निरीक्षक मो.नं. 8691811411 वर संपर्क करावा असे अवाहन जामखेड पोलीसांकडुन करण्यात आले आहे. आहे.

सदर गुन्हाचा तपास अहमदनगर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, कर्जत विभागाचेउपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील जामखेड यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. सदर बाबत, पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती, सहाय्यक निरीक्षक पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता गिरी, पो. कॉ. मांडगे, पो. कॉ. पळसे, पो. ना. सरोदे, कोपनर, पो. कॉ. घोळवे, पो. हवा. श्री. प्रविण इंगळे यांनी विशेष परीश्रम घेतले. पुढील तपास चालु असुन पोलीस उप निरीक्षक श्री. भारती हे पुढील तपास करीत आहेत. दोन्ही आरोपी अटक असुन आरोपींची दिनांक 14/11/2023 रोजी पावेतो पोलीस कोठडी अभिरक्षा आहे.


सदर बाबत कोणास काही माहीत असल्यास त्याने सदर बाबत पोलीस उप निरीक्षक अनिल भारती मो.नं. 9850387288 किंवा पोलीस ठाण्याचे 02421221033, फोन वर कळवावे.

महेश पाटील पोलीस निरीक्षक
जामखेड पोलीस ठाणे जि. अहमदनगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here