जामखेड बस स्थानकातून स्वारगेट बीड गाडीत बसत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी गळ्यातील मणी मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी गायब केले. तशी फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे.
जामखेड बसस्थानक येथे निता प्रदिप वाघमारे वय 45 वर्ष धंदा मजुरी रा. नायगाव ता. पाटोदा जि. बीड या आपल्या बीड जिल्ह्यातील नायगाव पिठ्ठी येथे जाण्यासाठी स्वारगेट बीड गाडीत बसत असताना गर्दीचा फायदा घेत गळ्यातील साडेतीन ग्रॅम वजणाचे मणी मंगळसूत्र अंदाजे किंमत 17.500 रूपये किंमतीचे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. गाडीत बसण्याच्या आगोदर गळ्यात असणारे मणी मंगळसूत्र गाडीत बसल्यावर गळ्यात नाही असे लक्षात येताच सगळीकडे पाहिले पण कोठेही आढळून आले नाही.
यानंतर गाडी जामखेड पोलीस स्टेशनला घेत पोलीसांनी तपासणी केली पण काहीही आढळले नाही. यानंतर निता प्रदिप वाघमारे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
आज दिनांक 03/12/2025 रोजी दुपारी 03/00वा. सुमा, बस स्टँण्ड जामखेड येथे एस. टी. बस मध्ये चढत असताना माझे गर्दीचा फायदा घेवुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने गळ्यातील साडेतीन ग्रॅम वजनाचे 17,500/- रुपये किंमतीचे सोन्याचे मणी मंगळसुत्र हे लबाडीच्या इराद्याने, स्वता: चे आर्थिक फायद्या करीता माझे संमती शिवाय चोरुन नेले आहे. अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. वरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण इंगळे करत आहेत.
चौकट बस स्थानकात सीसीटीव्ही बसवावेत
अनेक दिवसांपासून बस स्थानकाचे काम सुरू आहे आता काम पूर्ण झाले आहे. पण बस स्थानकात एकही सीसीटीव्ही नाही. अद्याप बस स्थानकाचे उद्घाटन झाले नाही. लोकांना बसण्यासाठी जागा नाही. प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. लवकरच लवकर सीसीटीव्ही बसवावेत अशी मागणी होत आहे.