जामखेड न्युज——
सराईत महिला चोराला जामखेड पोलीसांनी ठोकल्या बेड्या
जामखेड सह आसपासच्या तालुक्यात या महिलेवर गुन्हे दाखल
जामखेड पोलीसांनी पाच दिवसांपूर्वी एका सराईत पाकिटमारी करणाऱ्या महिला चोराला जेरबंद केले तिच्याकडे १७ हजार ७०० रूपयांच्या मुद्देमाल सापडला आहे. सखोल चौकशी केली असता या महिलेवर जामखेड सह कर्जत, करमाळा पोलीसात चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
याबाबत सविस्तर असे की, दि. ९ नोव्हेंबर म्हणजे अवघ्या सहा दिवसांत यातील फिर्यादी सोनाली सोमनाथ मुजगुडे रा. दुर्गापुर ता. राहता जि. अहमदनगर यांनी फिर्याद दिली की, दिवाळी सणानिमित्त गावी दुर्गापुर ता. राहता येथे जाण्यासाठी जामखेड बसस्थानकावर जामखेड ते नाशिक जाणा-या बसमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने सोनाली सोमनाथ मुजगुडे यांच्या १२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ५७००/- रुपये असा एकुण १७,७००/- रुपये चोरुन नेले आहे. त्यावरुन जामखेड पोलीस स्टेशन गुरजि. नं. 509/2023 भा.द.वि.क. 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या दिवाळी सण चालु असुन जामखेड बसस्टॅण्डवर जास्त प्रमाणात प्रवाशांची गर्दी असुन गर्दीच्या ठिकाणी दागीने चोरी व पाकीटमारी असे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असतात. त्याअनुषंगाने जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करुन सक्त पेट्रोलिंग बंदोबस्त नेमला होता. सदरचा गुन्हा घडल्यानंतर बस स्टॅण्डवर पेट्रोलिंग करत असलेले कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडे व पोलीस कॉन्स्टेबल देविदास पळसे यांनी एक महीला जामखेड बस स्टॅण्डवर संशयित रित्या फिरत असून लोकांचे बँगा चाचपडत असल्याचे पाहिले व त्याबाबत पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना कळविले. त्यांनी तात्काळ पोलीस हेडकॉन्टेबल प्रविण इंगळे, पोलीस नाईक संतोष कोपनर व महिला पोलीस कॉन्स्टेबल दहीरे यांना बसस्टॅण्डवर जावुन सदर महीलेस ताब्यात घेवुन चौकशी करा असे सांगतिले. सदर अंमलदार यांनी सदर संशियित महीला नामे अर्चना अजय भोसले वय 23 वर्षे, रा. वाकी ता. आष्टी जि.बीड हीस ताब्यात घेतले. सदर गुन्हयाचे अनुषंगाने तिचेकडे चौकशी केली असता तिने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. अर्चना अजय भोसले हीस नमुद गुन्ह्यात अटक करून मा.न्यायालकडुन पोलीस कोठडी रिमांड घेउन कसून चौकशी केली असता तिने वरील गुन्हा व जामखेड पोलीस स्टेशन गु. रजि. नं.498/23 भा.द.वि.क. 379 असे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीकडुन सदर दोन्ही गुन्ह्यात चोरलेले १२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ५७००/- रुपये असा एकुण १७,७००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.
आरोपी अर्चना अजय भोसले रा. वाकी ता. आष्टी जि.बीड हीचेवर पूर्वी दाखल असलेले गुन्हे जामखेड पोलीस स्टेशनला पाच गुन्हे, कर्जत पोलीस स्टेशनला तीन व करमाळा पोलीस स्टेशनला एक असे गुन्हे दाखल आहेत.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ प्रविण इंगळे हे करीत आहेत. सदरची महीला आरोपी सध्या न्यायालयीन कोठडी मध्ये आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक राकेश ओला, मा. अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खेरे , मा. उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे , जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ प्रविण इंगळे,पांना संतोष कोपनर, पोना जितेंद्र सरोदे, पोकों प्रकाश मांडगे, पोकों देविदास पळसे, पोकों कुलदिप घोळवे, मपोकों दहीरे यांनी केली आहे.