धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेचे उद्यापासून पुन्हा चौंडीत उपोषण नेत्यांना घराबाहेर पडू देणार नाही – बाळासाहेब दोडतले

0
659

जामखेड न्युज——

धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेचे उद्यापासून पुन्हा चौंडीत उपोषण

नेत्यांना घराबाहेर पडू देणार नाही – बाळासाहेब दोडतले

 

पन्नास दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणासाठी यशवंतसेनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मगाव चौंडी येथे एकवीस दिवसांचे उपोषण केले होते सरकारच्या वतीने उपोषण सोडताना पन्नास दिवसांची मुदत मागितली होती ती आज संपत असून सरकारने आरक्षणाबाबत एकही पाऊल उचलले नाही त्यामुळे उद्यापासून चौंडीत आमरण उपोषणाचा इशारा यशवंत सेनेच्या वतीने बाळासाहेब दोडतले यांनी दिला आहे.

यावेळी बाळासाहेब दोडतळे म्हणाले की, आमरण उपोषणाबरोबरच नेत्यांना गावबंदी बरोबरच धनगर समाज नेत्यांना घराबाहेर पडू देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.


याचबरोबर ओबीसी समाजाने धनगर आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा आम्हाला गृहित धरू नये असे स्पष्टपणे दोडतले यांनी सांगितले.

मागे एकवीस दिवसांचे उपोषण सोडवताना सरकारचे प्रतिनिधी नामदार गिरीश महाजन यांनी पन्नास दिवसांचा अवधी मागितला होता. तो आज संपत आहे. पन्नास दिवसात राज्य शासनाने काहीही केलेले नाही. राज्य सरकारने धनगर समाजाची क्रूर थट्टा केलेली आहे. आता सरकारचा सामना धनगर समाजाशी आहे हे सरकारने लक्षात घ्यावे.

उद्या सकाळपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळी स्मारकाच्या पायथ्याशी आमरण उपोषण सुरु करत आहोत असे यशवंत सेनेच्या वतीने जाहीर करण्यात आले तसेच महाराष्ट्रातील धनगर बांधव नेत्यांना घराबाहेर पडू देणार नाही असा इशारा दोडतळे यांनी दिला आहे.

यावेळी दोडतले म्हणाले की, चौंडी येथील उपोषण सोडुन ५०  दिवस झाले असले, तरी सरकारकडून अद्याप कुठलीही ठोस भुमिका घेण्यात आलेली नाही. हे सरकार धनगर समाजाची क्रुर थट्टा करत आहे. त्यामुळे झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी चौंडी येथे पुन्हा उपोषण सुरु करत आहोत.  

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here