सेवानिवृत्त प्राध्यापकाची दिड लाख रुपयांची पिशवी अज्ञात चोरट्यांनी केली लंपास

0
410

जामखेड न्युज——

सेवानिवृत्त प्राध्यापकाची दिड लाख रुपयांची पिशवी अज्ञात चोरट्यांनी केली लंपास

जामखेड महाविद्यालय जामखेड येथील सेवानिवृत्त प्राध्यापक बाबुराव राजेभोसले यांनी आज कँनरा बँक जामखेड येथून कृषी कर्जाची एक लाख चाळीस हजार रुपये काढले व मोटारसायकलवर घेऊन जात असताना रस्त्यात फोन आला म्हणून फोनवर बोलत असताना अज्ञात चोरट्यांनी गाडीच्या हँडला असलेली पिशवी घेऊन लंपास झाला. राजेभोसले चोराच्या मागे धावले पण पाय घसरून चिखलात पडले. तोपर्यंत पिशवी चोर लंपास झाला.

याबाबत जामखेड पोलीस स्टेशनला बाबुराव संभाजी राजेभोसले वय 64 वर्ष, धंदा- रिटायर शिक्षक रा. नान्नज ता. जामखेड हल्ली रा. प्रभाकरनगर,जामखेड ता. जामखेड फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, मी जामखेड महाविद्यालय, जामखेड येथे प्राध्यापक म्हणून नोकरीस होतो. सन 2019 मध्ये मी तेथुन सेवानिवृत्त झालो असून सध्या शेती व्यवसाय करुन तसेच मिळणा-या पेंशनवर मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितो. माझे, माझी पत्नी मनिषा तसेच मुलगा उदयसिंह असे आमचे कॅनरा बँक, जामखेड ता. जामखेड येथे बँक अकाऊंट असुन आम्ही तिघांनीही कॅनरा बँकेतुन मागील वर्ष पिककर्ज घेतले होते. मागील आठवड्यात सदरचे कर्ज भरुन प्रत्येकी 1,43,000/-रुपये नविन पिककर्ज मंजुर करुन घेतले होते.


आज दिनांक 06/07/2023 रोजी दुपारी 11/50 वा. चे. सुमारास मी कॅनरा बँक, जामखेड येथे मला
शेतकामासाठी पैशाची आवश्यकता असल्याने माझी पत्नी मनिषा हिचे अकाऊंट नंबर 5760101000590 चा
चेक घेवुन पैसे काढण्यासाठी माझे हिरो कंपनीच्या पॅशन प्रो मोटारसायकल नंबर एम. एच-16 बी. एन-0741 वरुन आलो होतो. सदरवेळी मी बँकेत गेल्यावर 1,40,000/- रुपये रक्कमेचा चेक दिला व कॅश काऊंटरवरुन 1,40,000/- रुपये घेतले व सदरची सर्व रक्कम माझे जवळ असलेल्या डब्याच्या पिशवीत ठेवले व 12:00 वा चे सुमारास मी बँकेच्या बाहेर आलो. बँकेच्या बाहेर आल्यानंतर मी माझे हातातील पिशवी माझे वरील मोटारसायकलचा हॅन्डलला अडकवली व मला फोन आल्याने मी फोनवर बोलु लागलो. त्याचवेळी माझे समोरुन एक इसम आला व मला काही समजायच्या आतच मोटारसायकलच्या हॅन्डलला लावलेली पैसे असलेली पिशवी घेवुन तेथुन पळुन जावु
लागला. मी आरडाओरडा केला व सदर इसमाचे मागे पळु लागलो. तो इसम एस. टी. बस स्टॅण्डचे दिशेने गेला त्यावेळी रस्त्यावर पावसामुळे चिखल असल्याने मी चिखलात घसरुन पडलो. तोपर्यंत सदर इसम दिसेनासा झाला. त्यानंतर मी एस.टी. बस स्टॅन्ड जामखेड व आसपासचे परिसरात सदर इसमाचा शोध घेतला. परंतु तो मला कोठेही दिसुन आला नाही.

त्यानंतर मी घडले प्रकाराबाबत तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन येथे आलो आहे. माझ्या चोरीस गेलेल्या पिशवीतील रक्कमेचे वर्णन खालीलप्रमाणे
1,40,000/- रुपये त्यात 500 रुपये किंमतीच्या 280 नोट्या. 1,40,000/- रुपये एकुण.
सदर चोरी करणारा इसम अंदाजे 20 ते 21 वर्ष वयाचा, अंगात राखाडी रंगाचा शर्ट व निळसर रंगाची जिन्स, अंगाने सडपातळ बांधाचा अशा वर्णनाचा होता. त्यास पाहील्यास मी ओळखेल.

वरील घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जामखेड पोलीस या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here