जामखेड न्युज——
गटशिक्षणाधिकारी म्हणून बाळासाहेब धनवे यांनी पदभार स्वीकारला
ल. ना. होशिंग विद्यालयाच्या वतीने सत्कार
गेल्या वर्षभरापासून रिक्त असलेल्या गटशिक्षणाधिकारी पदावर नगर येथे माध्यमिक चे उपशिक्षणाधिकारी असलेले बाळासाहेब धनवे यांची जामखेड गटशिक्षणाधिकारी म्हणून बदली झाली त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हा ल. ना. होशिंग विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
जामखेड तालुक्यातील गेल्या एक वर्षापासून रिक्त असलेल्या गटशिक्षणाधिकारी पदावर आज नगर (माध्य) जि.प.चे उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी जामखेड तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.
धनवे हे जामखेड तालुक्यातील सुपुत्र आहेत..
त्यांचा प्रवास जामखेड येथून शिक्षक पदावरून सुरु होउन प्रथम शिक्षण विस्तार अधिकारी तदनंतर राहुरी गटशिक्षणाधिकारी नंतर अ.नगर जि.प. येथे (माध्यमिक) उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली..
आणि एक वर्षापासून रिक्त असलेले जामखेड ग.शि.अ. पदी आज त्यांची नियुक्ती झाल्याने शिक्षण विभागाला एक वेगळी दिशा मिळण्यास मदत होणार आहे.
ल. ना . होशिंग मध्ये बाळासाहेब धनवे यांचा सत्कार करण्यात आला स्वागत सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की मी शिक्षक होतो आणि मला शिक्षकांप्रती आदर आहे. समन्वयाने काम करू असे आश्वासन साहेबांनी यावेळी दिले.
आपले काम प्रामाणिक पणे करा असा मोलाचा सल्ला देखील दिला
यावेळी ल. ना होशिंगचे उपप्राचार्य रमेश अडसूळ, शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत विश्वस्त मुकुंदराज सातपुते, माजी चेअरमन राम निकम, माजी चेअरमन नारायण राऊत, केंद्रप्रमुख किसन वराट, संजय घोडके, सुरेश मोहिते, माजी केंद्र प्रमुख सुरेश कुंभार, साकत के.प्र. मल्हारी पारखे, शिक्षक. समिती अध्यक्ष विजय जाधव, प्रताप पवार योग शिक्षक व पर्यवेक्षक बाळासाहेब पारखे हे उपस्थित होते.
यावेळी जामखेड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते..