जामखेड बाजार समितीची निवडणूक होणार दुरंगी १८ जागेसाठी ३८ उमेदवारी अर्ज शिल्लक

0
329

जामखेड न्युज——

जामखेड बाजार समितीची निवडणूक होणार दुरंगी

१८ जागेसाठी ३८ उमेदवारी अर्ज शिल्लक

जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी दुरंगी पॅनलचे चित्र स्पष्ट झाले आहे. एकुण १८ जागेसाठी ३८ अर्ज शिल्लक राहिले आहेत. तब्बल १४४ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यामुळे १८ जागेसाठी ३८ अर्ज शिल्लक राहिले आहेत.


ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघासाठी
कार्ले शरद, पाटील वैजीनाथ, पाटील हनुमंत, शिंदे शरद दोन जागेसाठी चार उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघ गोरे नंदकुमार, बारगजे हनुमंत एका जागेसाठी दोन

ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ तुपेरे बबन, ससाणे सिताराम, साळवे सुनील एका जागेसाठी तीन

असे चार जागेसाठी नऊ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

सहकारी संस्था मतदारसंघ सर्वसाधारण सात जागेसाठी पंधरा उमेदवार निवडणूक लढवत आहेत
उतेकर गौतम, गिते मच्छिंद्र, घुमरे सचिन, चव्हाण जालिंदर, जगदाळे विलास, ढगे सतिश, ढवळे अंकुश, पवार तुषार, पवार शहाजी, भोंडवे विष्णू, भोसले शिवाजी, राळेभात सुधीर, लटके गणेश, वराट कैलास, गिते सतिश

सहकारी संस्था महिला मतदारसंघ
दोन जागेसाठी चार उमेदवार
चव्हाण रतन, भोरे शारदा, गिते अनिता, शिंदे सुरेखा,

सहकारी संस्था इतर मागास प्रवर्ग मतदारसंघ
एका जागेसाठी दोन उमेदवार
जगताप गणेश, डुचे महादेव

सहकारी संस्था भटक्या जाती जमाती मतदारसंघ
एका जागेसाठी दोन उमेदवार
जायभाय नारायण, महारनवर अशोक

असे सोसायटी मतदारसंघात अकरा जागेसाठी २३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

व्यापारी मतदारसंघ दोन जागेसाठी चार उमेदवार निवडणूक लढवत आहेत ते पुढील प्रमाणे

उगलमुगले हरिदास, पवार सुरेश, बेदमुथ्था राहुल, बोरा महेंद्र

हमाल मापाडी मतदारसंघ एका जागेसाठी दोन उमेदवार निवडणूक लढवत आहेत

खैरे दत्तात्रय, हुलगुंडे रविंद्र

एकुण १८ जागेसाठी ३८ अर्ज शिल्लक राहिले आहेत. तब्बल १४४ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यामुळे १८ जागेसाठी ३८ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

18 जागांसाठी होणार निवडणूक आहे

जामखेड बाजार समितीची निवडणूक 18 जागेसाठी होणार. यामध्ये कृषि पतसंस्था आणि बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघातून 11 सदस्य निवडले जाणार आहेत. या मतदारसंघात सर्वसाधारण 7, महिला राखीव 2, इतर मागास प्रवर्ग 1, विमुक्त जाती / भटक्या जाती 1 असे उमेदवार निवडले जाणार आहेत. तर ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी या मतदारसंघासाठी 4 जागा आहेत. यामध्ये सर्वसाधारण 2, अनुसूचित जाती जमाती 1 आणि आर्थिक दुर्बल घटक 1 असे सदस्य निवडले जाणार आहेत. व्यापारी / आडते मतदारसंघासाठी 2 जागा आहेत. हमाल/ मापाडी मतदारसंघासाठी 1 जागा आहे. असे एकुण 18 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी आर एफ निकम हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत.

जामखेड बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम खालील प्रमाणे

चिन्ह वाटप – 21 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता ( निवडणूक कार्यालय व संस्था नोटीस बोर्ड)

मतदान – 30 एप्रिल 2023 ( वेळ सकाळी 8 ते 4 ) स्थळ नंतर घोषित करण्यात येईल

निकाल – 30 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता ( स्थळ व तारीख नंतर घोषित करण्यात येईल)

निकाल घोषणा – मतमोजणी दिवशी ठिकाण व निकाल तारीख जाहीर करण्यात येईल.
अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आर. एफ. निकम यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here