Wednesday, February 11, 2026
Home शैक्षणिक बातम्या दहा हजारात एखादाच वक्ता जन्माला येतो – मनोहर इनामदार स्वातंत्र्य सैनिक...

दहा हजारात एखादाच वक्ता जन्माला येतो – मनोहर इनामदार स्वातंत्र्य सैनिक कै. मधुकाका देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जामखेडमध्ये आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

0
307

जामखेड न्युज ——

दहा हजारात एखादाच वक्ता जन्माला येतो – मनोहर इनामदार

स्वातंत्र्य सैनिक कै. मधुकाका देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जामखेडमध्ये आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

शतेषु जायते शूरः सहस्त्रेषु च पण्डितः |
वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवति वा न वा ||

शंभर लोकात एक शुर, हजार लोकात एक विद्वान तर तर दहा हजार लोकात एक वक्ता जन्माला येतो
यामुळे वक्तृत्व स्पर्धेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
परंतु दहा हजार लोकात दाता जन्माला येईलच नाही असे आहे. पण देशमुख परिवार हे खरोखर दाते आहेत. त्यांच्या मुळे भव्य दिव्य शैक्षणिक संकुल उभे आहे या संकुलात अनेक मान्यवर व्यक्ती घडल्या आहेत. त्यामुळे वक्तृत्व कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या जामखेड महाविद्यालय जामखेड आणी ल.ना.होशिंग
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वा. सैनिक कै. मधुकाका देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचे उद्घाटक आदर्श शिक्षक श्री. मनोहर इनामदार (गवसणीकार) (जि.प.प्राथ. शाळा दत्तवाडी, धोंडपारगाव) यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार राजेशजी मोरे, संचालक अशोक शिंगवी, अरूणराव देशमुख, प्राचार्य डॉ एम. एल. डोंगरे, उपप्राचार्य डॉ. सुनिल नरके, प्राचार्य श्रीकांत होशिंग, प्रा. अविनाश फलके, मुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, उपमुख्याध्यापक रमेश अडसुळ, लक्ष्मीकांत देशमुख, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना इनामदार सर म्हणाले की, यशस्वी लोकांचे जीवन वक्तृत्वाने घडलेले आहे. प्रभावी वक्तृत्वाने क्रांती घडते म्हणून वक्तृत्व खूपच महत्त्वाचे आहे. यामुळे आपण जीवनात आपण उच्च पदावर जाता येते. यावेळी त्यांनी लढणार मी लढणार हे काव्य गायले.

यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना उद्धवराव देशमुख म्हणाले की, काय सांगे वडिलांची किर्ती
वडील जिथे असतील ते आनंदात असतील
त्यांचे कार्य पुढे घेऊन जात आहोत. यातच समाधान आहे.

यावेळी बोलताना अशोक शिंगवी म्हणाले की,
तालुक्याची ओळख देशमुख कुटुंबियांनी शैक्षणिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली. तसेच परिसरातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी जामखेडची वेगळी ओळख राज्यात निर्माण केली.

यावेळी बोलताना संस्थेचे सचिव शशिकांत देशमुख म्हणाले की, वाचनामुळे आपले व्यक्तिमत्त्व घडते वक्तृत्व हे शस्त्र खुप मोठे आहे. यातून राज्याला चांगले वक्ते मिळणार आहेत.

यावेळी बोलताना अरूणराव देशमुख म्हणाले की, आमच्या वर चांगले संस्कार केले यामुळे चांगले जीवन जगत आहोत. यामुळे शिक्षणांचे काम पावित्र्याचे घडत आहे. हिऱ्याला पैलू पाडण्याचे काम येथील शिक्षक करतात. सध्याचे जग स्पर्धेचे आहे. मेहनतीशिवाय यश मिळत नाही. वाचाल तर वाचाल स्पर्धेत टिकाल वाचनाला वैचारीक खोली हवी शब्द हे वक्तृत्वाचे शरीर आहे.

कार्यक्रमाचे प्रस्तावित प्राचार्य डोंगरे यांनी केले वक्तृत्व स्पर्धेत काँफी नक्कल करता येत नाही यासाठी वाचन, मनन, चिंतन आवश्यक असते.

परिक्षक कोल्हे सर, तनपुरे सर यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल देडे, प्रा. तुकाराम घोगरदरे यांनी तर आभार उपप्राचार्य डॉ. सुनील नरके यांनी मानले.

स्पर्धेचे विषय पुढील प्रमाणे होते.

१. मी नव्या युगाचा / युगाची मतदार.
२. आधुनिक शेती व आव्हाने.
३. आजचे शिक्षण रोजगाराभिमुख आहे का ?
४. राष्ट्र निर्माणासाठी युवकांची भुमिका.
५. कोरोनाने आम्हाला काय दिले ?
६. भारतीय कुटुंबसंस्था – संस्कार केंद्र.
७. समान नागरी कायदा – अपेक्षा आणि वास्तव.
८. स्टार्ट-अप आणि विद्यार्थी.
९. उर्जास्त्रोत – समस्या व उपाय योजना.
१०. स्त्रियांना आरक्षण मिळाले… संरक्षणाचे काय ?
११. सक्षम लोकशाहीची पहिली पायरी-मतदार नोंदणी

स्पर्धेसाठी पुढील प्रमाणे पारितोषिक ठेवण्यात आले होते.
प्रथम – ५००१/- स्मृती चिन्ह + सन्मानपत्र
द्वितीय ३००१/- स्मृती चिन्ह + सन्मानपत्र
तृतीय २००१/- स्मृती चिन्ह + सन्मानपत्र
उत्तेजनार्थ १००१/- स्मृती चिन्ह + सन्मानपत्र
उत्तेजनार्थ १००१/- स्मृती चिन्ह + सन्मानपत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!