जामखेडमध्ये ७५ मीटर तिरंगा रॅलीचा जल्लोष, एनसीसी विद्यार्थ्यांनी वेधले नागरिकांचे लक्ष
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), १७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहिल्यानगर, जामखेड विभाग तसेच सर्व प्रशासकीय विभागांच्या माध्यमातून ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत जामखेड येथे भव्य ७५ मीटर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
आज सकाळी नऊ वाजता रॅलीचा प्रारंभ तहसील कार्यालयाच्या पटांगणातून झाला. यावेळी नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, मुख्याधिकारी अजय साळवे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, कॅप्टन व एनसीसी ऑफिसर गौतम केळकर, मुख्याधिकारी अजय साळवे, प्राचार्य बी. के. मडके, प्राचार्य व योगगुरू प्राचार्य बी ए पारखे, उपप्राचार्य युवराज भोसले, पर्यवेक्षक सुदाम वराट, कॅप्टन लक्ष्मण भोरे, बजरंग डोके, मोहन यादव, नानासाहेब बाबर, मंडलाधिकारी आय एन काळे, सौरभ साळुंखे, एनसीसी ऑफिसर अनिल देडे, मयूर भोसले, सुग्रीव ठाकरे, साई भोसले यांच्या सह जामखेड महाविद्यालय जामखेड, ल. ना होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नागेश विद्यालय, कन्या विद्यालयातील विद्यार्थी, नागरिक, युवक, महिला तसेच विविध प्रशासकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
७५ मीटर लांबीचा भव्य तिरंगा घेऊन ही रॅली तहसील पटांगणातून सुरू होऊन बीड रोड, जय हिंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज पेठ, संविधान स्तंभ, खर्डी चौकातून तहसील कार्यालय, जामखेड महाविद्यालय असा मार्गक्रमण करीत जामखेड महाविद्यालय पोहचली यावेळी तिरंग्यावर पुष्प वृष्टी करण्यात आली.
या रॅलीच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला ७५ मीटर लांबीचा तिरंगा हे या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले तिरंग्याच्या सन्मानासाठी नागरिक शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी घोषणांनी आसमंत दुमदुमला होता.
‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक घरात राष्ट्रध्वज फडकविण्या सोबतच नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान आणि आदराची भावना दृढ करण्याचा संदेश दिला गेला जामखेडमध्ये आयोजित करण्यात आलेली ७५ मीटर तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली.