आमदार प्रा राम शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून होणार विविध विकास कामे, 26 गावांसाठी 2 कोटी 14 लाखांच्या निधीचा प्रस्ताव दाखल !

0
220

 

जामखेड न्युज——

आमदार प्रा राम शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून होणार विविध विकास कामे, 26 गावांसाठी 2 कोटी 14 लाखांच्या निधीचा प्रस्ताव दाखल !

आमदार प्रा राम शिंदे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून कर्जत-जामखेड मतदारसंघात विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. दोन दिवसांपुर्वी जिल्हा नियोजनकडे मतदारसंघातील डिप्यांसाठी 2 कोटी रूपयांच्या निधीचा प्रस्ताव दाखल केल्यानंतर आता मतदारसंघातील 26 गावांमधील 28 कामांसाठी 2 कोटी 14 लाख रूपयांच्या निधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आमदार प्रा राम शिंदे यांच्या कार्यालयाकडून सादर करण्यात आला आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे भाग्यविधाते आमदार प्रा राम शिंदे यांनी मतदारसंघात विविध कामे मंजुर करण्याचा धडाका सुरु केल्याने भाजपा कार्यकर्त्यांसह शिंदे समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे. आमदार राम शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून सभामंडप, शाळा खोल्या, पेव्हिंग ब्लाॅक, आरओ फिल्टर, सिंगल फेज, थ्री फेज डिप्या, रस्ता काँक्रीटीकरण, स्मशाभूमी सुशोभीकरण, इत्यादी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघातील 26 गावांमध्ये ही कामे होणार आहेत. यासाठी 2 कोटी 13 लाख 60 हजार रूपयांचा निधी खर्च होणार आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात मतदारसंघासाठी भरीव निधी खेचून आणला होता. त्यांनी मतदारसंघात विकासाचा नवा झंझावात निर्माण केला होता. यातून त्यांनी मतदारसंघाची राज्यात वेगळी ओळख निर्माण केली होती. विकास कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी वैयक्तिक पातळीवर लक्ष घातले होते. तसेच शासन दरबारी असलेले आपले राजकीय वजन वापरून मतदारसंघात करोडो रूपयांचा निधी आणला होता. आता पुन्हा एकदा हाच झंझावात मतदारसंघात निर्माण झाला आहे.

गेल्या तीन दिवसांत आमदार प्रा राम शिंदे यांनी मतदारसंघासाठी 9 कोटींचा निधी मंजुर करून आणला आहे. त्याचबरोबर आता त्यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून 4 कोटींची कामे प्रस्तावित केली आहे. याबाबत त्यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले आहेत.या प्रस्तावित कामांना तात्काळ प्रशासकीय मान्यता प्राप्त होणार आहे.आमदार राम शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून मतदारसंघात विविध गावांमध्ये विकास कामे मंजुर होऊ लागल्याने मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

आमदार प्रा राम शिंदे यांनी जिल्हा नियोजनकडे सुचवलेली कामे आणि निधी खालीलप्रमाणे

1) अरणगाव – संत वामनभाऊ मंदिरासमोर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
2) पिंपरखेड – वेशीजवळील परिसरात पेव्हिंग ब्लाॅक बसवणे – 10 लाख रूपये
3) धामणगाव – 1 शाळा खोली – 10 लाख रूपये
4) नान्नज – 1 शाळा खोली – 10 लाख रूपये
5) बांधखडक – 1 शाळा खोली – 10 लाख रूपये
6) जामखेड- टेकाळेनगर जगदंबा देवी मंदिर सभामंडप – 10 लाख रूपये
7) जांबवाडी -तुळजाभवानी मंदिर सभामंडप- 5 लाख रूपये
8) सांगवी – डिपी – 3 लाख 60 हजार
9) धनेगाव – गावाजवळील पाण्याची टाकी येथे 1 व झोपडपट्टी येथे 1 असे 2 आरो फिल्टर बसवणे

कर्जत तालुक्यातील कामे

1) बजरंगवाडी – हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
2) कोरेगाव – गलांडेवाडी मारूती मंदिरासमोर सभामंडप बांधणे – 7 लाख रूपये
3) आळसुंदे – मरिमाता देवी मंदिरासमोर पेव्हिंग ब्लाॅक बसवणे – 10 लाख रूपये
4) कोकणगाव – गावठाण अंतर्गत पेव्हिंग ब्लाॅक बसविणे – 5 लाख रूपये
5) मिरजगाव – आंबेडकर रोड ते पवळ काॅलनी रस्ता काँक्रीटीकरण करणे 7 लाख रूपये
6) कुळधरण – बाजारतळ येथे पेव्हिंग ब्लाॅक बसविणे – 7 लाख रूपये
7) जलालपुर – महादेव मंदिरासमोर पेव्हिंग ब्लाॅक बसविणे – 10 लाख रूपये
8) मुळेवाडी – लक्ष्मीमाता मंदिर येथे सभामंडप बांधणे – 5 लाख रूपये
9) मुळेवाडी – श्रृंगेरीमाता मंदिर येथे सभामंडप बांधणे – 5 लाख रूपये
10) धांडेवाडी – स्मशाभूमी सुशोभीकरण करणे – 7 लाख रूपये
11) नागमठाण- शिंदे वस्ती येथे सिमेंट कॉंक्रीटीकरण रस्ता बनवणे – 5 लाख रूपये
12) होलेवाडी – हनुमान मंदिरासमोर पेव्हिंग ब्लाॅक बसविणे – 5 लाख रूपये
13) चांदे खुर्द – महादेव मंदिरासमोर सभामंडप बांधणे – 5 लाख रूपये
14) बहिरोबावाडी – मोतीबाग मळा थ्री फेज (63) डिपी बसवणे – 10 लाख रूपये
15) बहिरोबावाडी – बहिरोबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
16) नांदगाव – रोकडोबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
सुपा – बोरीचा मळा – छत्रगुण जगताप वस्ती थ्री फेज (63) डिपी – 10 लाख रूपये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here